गांजा सेवनाचे साहित्य बाळगल्याप्रकरणी कारिवडेतील एक ताब्यात…
सावंतवाडी
गांजा सेवन करण्याचे साहित्य बाळगल्या प्रकरणी कारिवडे येथील युवकावर सावंतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडुन साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई आज सकाळी सावंतवाडी शहरातील गार्डनच्या पाठिमागे करण्यात आली. याबाबत अज्ञात व्यक्तीने पोलिसांना १२२ नंबरवरुन फोन करुन ही माहिती दिली होती.
त्यानुसार त्याला ताब्यात घेण्यात आले. हर्षद उर्फ हरिश सुहास पार्सेकर (वय २९, रा.कारिवडे) असे त्याचे नाव आहे. त्याला नोटीस बजावण्यात आली असूून त्याला उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, असे ठाणे अमंलदार गुरू नाईक यांनी सांगितले. ही कारवाई मनोज राऊत, दर्शन सावंत, अनिल धुरी, शरद जेठे आदींच्या पथकाकडून करण्यात आली.