*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*मलाच मी शोधत असतो*
मलाच मी शोधत असतो
आयुष्याला कोसत असतो
उगाच मी फसत असतो
आतून मी जळत असतो
इकडे तिकडे पळत असतो
संकटाला टाळत असतो
आनंदात हसत असतो
दुःखात मात्र रडत असतो
भयाला मी घाबरत असतो
जीवाला मी जपत असतो
नको ते ऐकत असतो
देवा शपथ खरंच बोलत असतो
आजूबाजूला बघत असतो
नाकासमोर चालत असतो
उगाच मी झोपत असतो
नको ती स्वप्ने पहात असतो
खोटेपणाला भिडत असतो
खूपच जास्त विचार करत असतो
विचार कागदावर लिहित असतो
काव्य रुपात मांडत असतो
स्वतःला मी रमवत असतो
बरेच काही करत असतो
तरीही
मलाच मी शोधत असतो
कवी :-
*चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*चांदवडकर, धुळे.*
७५८८३१८५४३.
८२०८६६७४७७.