You are currently viewing मामाना गावनी मज्जा..

मामाना गावनी मज्जा..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्राध्यापिका सौ. सुमती पवार लिखित अहिराणी बोलीतील अप्रतिम काव्यरचना*

 

*मामाना गावनी मज्जा..*

 

चाईसगांवना ठेसनवर मायना संगे जाऊत

ठेसनवर बठी बठी गंमत दखत ऱ्हाऊत

गाडी ये ये धडाडधूम जीव धडधड करे

दादरावर मानसे चढेत आमना डोकावऱ्हे..

 

अथाईन ऊनी तथाईन उनी भलतं भारी वाटे

मामाना गावनं कौतिक भलतंज मनम्हां दाटे

फिरकीना तांब्याम्हानं पानी घडी घडी पिऊत

मालगाडीना डब्बा मंग कितला, मोजत ऱ्हावूत..

 

पॅसेंजर उनी उनी लोके चिल्लायेत

ठयरताज गाडी मंग गलका गर्दी करेत

मायनं बोट धरीसंन आम्ही चढी जाऊत

हिरापूर ऊनं का खिडकीम्हांईन् दखूत…

 

ऊनं ऊनं हिरापूर उच्या पायऱ्यासवर

खडीवर उतरीपडूत बाजूना पटरीसवर

मामा दिखे उभा तठे तोंडवर हसू फुटे

दिवाईनी सुट्टीना मंग आनंद तठे भेटे…

 

डोयासमोर दिखस अजून चाईसगांवनं ठेसंन

कोल्लं तिखं भाकर लागे भलतं न्यामी बेसन

तशी मजा उनी नही पुन्हा फिरिन देखा

सपनम्हा येतीस गाड्या माले मारतीस हाका..

 

गनं बार गऊ पन हाईज याद ऱ्हायनं

दवडी गे हो, मामान गांव भलतं दूर पयनं..

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा