You are currently viewing तळवडे ( सावंतवाडी ) येथील रक्तदान शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद

तळवडे ( सावंतवाडी ) येथील रक्तदान शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद

तळवडे ( सावंतवाडी ) येथील रक्तदान शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद

सावंतवाडी

*स्वर्गीय प्रकाश परब यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त २३ ऑक्टोबर २०२४ रोजी “प्रकाश परब मित्रमंडळ, तळवडे” आणि “ऑन काॅल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग” यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. प्रकाश परब संपर्क कार्यालयात “भव्य रक्तदान शिबिर” आयोजित करण्यात आले होते.*
*या रक्तदान शिबिरामध्ये एकूण तेहत्तीस (३३)रक्तदात्यांनी रक्तदान केले, त्यामध्ये महिला रक्तदात्यांसहीत जास्तीत जास्त तरुण रक्तदात्यांचा सहभाग होता. यावेळी ज्येष्ठ रक्तदाते संजय पई यांनी तर आपले तब्बल पस्तीसावे रक्तदान केले.*
*यावेळी “प्रकाश परब मित्रमंडळ, तळवडे” चे गोडकर गुरुजी, घाडीसर,प्रकाश परब यांचे ज्येष्ठ बंधू व मिरज माजी जिल्हाधिकारी शेखरभाई परब, संजय पई, नारायण उर्फ राजू परब, सुरज परब, अनिल जाधव, श्यामसुंदर मालवणकर, दिलिप मालवणकर, विलास नाईक, रविंद्र काजरेकर, विलास परब, रविंद्र सावंत, महेश परब, योगेश सावंत, दिनेश परब, विनोद वराडकर, आपा परब, काशिराम कुंभार, गौरव मेस्त्री, दत्तप्रसाद परब, बबन काळे, दिपक लोके तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते .*
*यावेळी “ऑन काॅल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग” चे अध्यक्ष तथा माजी डीवायएसपी, आदरणीय दयानंदजी गवस साहेब, उपाध्यक्षा मीनल सावंत मॅडम्, सचिव बाबली गवंडे, कार्यकारिणी सदस्य सचिन कोंडये, कधीही फोन करा धावून येणारे रक्तदाते मंगेश माणगावकर व सुनिल गावडे (तोरसे-पेडणे), उमा वराडकर मॅडम्, प्रकाश वराडकर, मळेवाड हायस्कूलचे मुख्याध्यापक साळस्कर सर आदि उपस्थित होते.*
*यावेळी जनतेच्या हितासाठी कायम कार्यरत असणार्‍या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला .*
*युवराज ठाकुर (मठ) या ऑनकाॅल रक्तदात्याने प्रकाश परब मित्रमंडळाच्या तळवडे ठिकाणी सतत सहाव्या वर्षी इतक्या लांब येऊन रक्तदान केले .त्यांचा विशेष उल्लेख व सत्कार मंडळातर्फे करण्यात आला*

*आपल्या “ऑन काॅल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग” चे अध्यक्ष व माजी सिंधुदुर्ग डीवायएसपी ,आदरणीय दयानंदजी गवस सर यांनी संस्थेच्या आजीवन सदस्यत्वाकरीता केलेल्या आवाहनाला अनुसरुन जवळपास पंधरा-सोळा सदस्यांनी रक्तदान शिबिराचे ठिकाणीच आजीवन सदस्यत्व स्विकारले तर संजय पई यांनी तळवडे गावातून तब्बल शंभर आजीव सभासद करणारच असल्याचे जाहीर केले.*
*यावेळी सावंतवाडी सरकारी रूग्णालय रक्तपेढीच्या रक्तसंक्रमण अधिकारी डाॅ. प्रज्ञा पाटील, रक्तपेढी सिस्टर प्राजक्ता रेडकर, मानसी बागेवाडी तसेच रक्तपेढी सहाय्यक अनिल खाडे यांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने रक्तसंकलन केले.*

*जगातील सर्वश्रेष्ठ दान असलेल्या रक्तदानासाठी सर्व भागांतून आवर्जुन येऊन रक्तदान करून रक्ताचे नाते समाजात निर्माण करणाऱ्या या ऑनकाॅल रक्तदात्यानां मनापासुन सॅल्युट*…

प्रतिक्रिया व्यक्त करा