*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री भारती वाघमारे लिखित अप्रतिम काव्यरचना*
अध्याय -१
*मधू कैटभ वध*
सूरथ राजा जिंकून आला घरी.
प्रजेचे पालन पुत्राप्रमाने करी.
संग्राम मांडला कपटी शत्रूने.
क्रुतघ्न मंत्र्यांनी लुटले खजिने.
एकटा राजा दुर वनात निघून गेला.
विचार करत आश्रमाजवळ आला.
आश्रमाजवळ एक वैश्य होता दुःखी.
आधार देत राजा बोले जगात नाही कुणी सुखी.
वैश्य सांगे राजाला मी धनवंताचा धनी.
सोडले बायको-मुलानेआधाराला नाही कुणी.
पत्नी आणि पुत्राची काळजी वाटते मला.
संपत्ती साठी माझा विचार नाही केला.
राजा बोले वैश्याला द्रव्यलोभाने टाकून दिला.
त्यांच्याविषयी काळजी का वाटते तुला.
वैश्य म्हणे,खरे आहे,पन मन मानत नाही.
पुत्रप्रेमाच्या ओढिने नयन वाट पाही.
उठून दोघे गेले मुनिंच्या आश्रमात.
नमन करून मुनींना सांगितली हकिकत.
ऋषी बोलू लागले पक्षांनाही जानिव भावना असतात.
म्हणून आपल्या आधी पक्षी पिलांना अन्न देतात
उत्पत्ती व पालन करणारी हीच महामाया.
मोहाच्या भवऱ्यात फिरते आपलीच काया .
विश्वसंहार विष्णू पाण्यावर झोपी गेले
कानातील मळापासून मधु कैटभ राक्षस जन्मा आले
ब्रह्मदेवांना मारण्यासाठी मधुकैटभ सज्ज झाले .
ब्रह्मदेवांनी घाबरून विष्णूकडे पाहिले .
सर्वसंहारणी विष्णु देवास उठवा विनंती ब्रह्मदेवाने केली .
सर्व गात्रातून तामसी देवी प्रकट झाली .
5000 वर्षे विष्णूदेवाने असुरां सोबत मल युद्ध केले.
बलशाली असूर महामायेच्या कोषात भ्रष्ट झाले.
विष्णू बोले असुरांना तुमचे मरण हाती आमच्या.
सांगा काय इच्छा आहे तुमच्या.
असुर बोले विष्णूंना, नसेल जेथे पाणी तेथे आमचा वध कर.
विष्णू बोले असूरांना बसा तुम्ही माझ्या मांडीवर.
घेऊन सुदर्शन चक्र मस्तके त्यांची छाटली .
सांगा प्रेक्षकांनो काव्यरूपी कथा पहिल्या अध्यायाची कशी वाटली.
सौ भारती वाघमारे
मंचर
तालुका आंबेगाव
जिल्हा पुणे