You are currently viewing एक रात्र अशी

एक रात्र अशी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य लेखक कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम कथा*

 

*’एक रात्र अशी’*

*(एक रहस्यमय कथा)*

 

कधी नव्हे त्या दिवशी मी एकटाच शेतात गेलो कामाच्या गडबडीत केव्हा अंधार झाला काही कळालेच नाही. तेव्हा काम अर्धवट सोडून घरची वाट धरली.काळोख बघून तर जास्तच भिंती वाटायला लागली कारण दिवस मावळण्याधीच घरी परतायचो पण यावेळी काही कळलंच नाही केव्हा अंधार पडला म्हणून वेळेच्या आत घरी पोहचण्यासाठी जिव तळमळायला लागला.सगळीकडे गर्द अंधार,रातकिड्यांची किरकिर‌, कुत्र्यांचं भुंकण,सळसळणारी हवा सर्वत्र काळोख,कुणाचीच चाहूल लागत नव्हती सर्वत्र स्मशान शांतता होती म्हणून कुणी दिसतही नव्हते.अशा भयानक रात्री मी एकटाच जिव मुठीत घेऊन पावलं पुढं टाकीत होतो काळोखामुळे मलाच कळत नव्हते मी नेमका कुठे आहे.देवाच नाव‌ घेत हळूहळू पुढे सरकत होतो.अंधाराने जणू मला घेरलंच होत त्यामुळे मी तर घामाने पुर्णपणे ओलाचिंब झालो.अशात घराची वाटही सापडत नव्हती वेड्यासारखा चालतच होतो आणि घर ही काही लवकर येत नव्हते.काय करावं काही कळेना.थोडं दुर पर्याय चालतं गेल्यावर कुठून तरी खळखळ वाहणाऱ्या पाण्याचा आवाज येत होता आवाज एकून मला वेगळंच काही वाटत होत पण तो वाहत्या पाण्याचाच आवाज होता. त्या वाहत्या पाण्यात चंद्राचं प्रतिबिंब स्पष्ट दिसत होते म्हणून ते प्रतिबिंब पहात पहात रस्ता तुडवीत होतो.जसा पाण्याचा पाट पार केला तसा हळुवारपणे छम छम आवाज येवू लागला.बापरे माझ्या पोटात तर खड्डा पडला.सुरवातीला कदाचीत भास असावा असं वाटतं होतं .मी थांबलो की आवाज थांबायचा चालायला लागलो की छम छम आवाज यायचा माझ्या पाठी मागून कोणीतरी येतंय यांचा मी अंदाज बांधला पण मागे वळून बघण्याची माझी हिंमत होत नव्हती.स्वतःला सांभाळून चालायला लागलो तरी हा छमछम आवाज काही करता जाईना. तो छमछम आवाज म्हणजे पैंजणीच्या आवाजासारखा आवाज होता.बापरे आपल्या मागे कोणीतरी बाई तर नाही ना ?,शंका यायला लागली.त्या काळोखात मी पळायला लागलो तर काय मी जसा पळायचो तसा छमछम आवाजही माझा पिच्छा काही सोडत नव्हता.मी तर पुरताच कोसळलो कुणाला बोलवावं,कुणाला आवाज द्यावा काही कळतं नव्हते.कोण असेल बरं आपल्या मागे चेटकीण की अतृप्त आत्मा कोण असेल! विचार चक्राची गती काही थांबत नव्हती.खर तर शेतात येण्याची इच्छा नसतांनाही आलो आणि स्वताहून आफत ओढवून घेतली भोगा आता स्वतःशीच मनोमनी बोलतं घराच्या दिशेने पावलं टाकत जाण्यास निघालो.

मनोमनी बडबड करत असताना काही अंतर चालत गेलो असेल अशातच घुबडांचा आवाज मला छळायला लागला आभाळात अनेक पक्षी गिरक्या घेत होते आभाळातील पक्षी अस्पष्ट दिसत नसले तरी कावळे किंवा गिधाडे असावीत असा अंदाज बांधला.आता आभाळात पक्षी गिरक्या घ्यायला लागले म्हणजे आपलं काही खरं नाही काही पक्षी तर अगदी माझ्या डोक्याच्या जवळून जात होतो.मी तर रडकुंडीला आलो.तेव्हड्यात कुठून तरी कर.‌‌…कर..असा आवाज यायला लागला.बापरै..आत हे आणखी काय छम छम आवाजा नंतर करं….करं ….आवाज. म्हणजे भुतांच कुटुंब माझ्या मागावर आहे की काय असंच वाटायला लागलं.आता आपण जिवंत रहात नाही याची खात्री पटली आणि अचानक मागून आवाज आला….’काय रे गडी एव्हढ्या रात्री कुठे गेला होतास आणि कुठे चाललास हातात काठी घ्यायची सोबत बॅटरी राहू द्यायची जनावरांची भिंती नाही का वाटत तुला..हं.!.अशा काळोखात भुतं फिरतात कळत नाही का तुला,अरै आज अमावस्यची रात्र आहे.अमवस्याची रात्र म्हणजे लयी खडतर रात्र असते काय.तेव्हा स्वत:ला सांभाळ पुढच्या वळणावर स्मशानभूमी आहे.’ तो कोणीतरी माणूस बोलत असताना मी मात्र गप्पच एक शब्द तोंडातून काढला नाही.मी न बोलता चालत होतो.आणि अमावस्या ची रात्र म्हटल्यावर म्हणजे भुतं प्रेतांची रात्र अमावस्येलाच सगळे एकत्र जमतात यांचा अर्थ आपलं काहीच खरं नाही.आता तो सांभाळ स्वतःला असं सांगून गेल्यावर तर माझा जिव निघायला लागला.तो माणूस कोण होता कोण जाणे पण मी डोळे फाडून त्यांच्याकडे पाहीले तर तो जुनाट सायकलवर बसून जात होता आणि कर कर आवाज म्हणजे त्याच्या त्या जुनाट सायकलीच्या पायडलचा आवाज होता.मी दिर्घ श्वास सोडला शिवाय तो माणूस अमावस्याची रात्र

भुतं वगैरे असं काही सांगुन गेल्याने तर माझी चांगलीच टरकायल लागली अशावेळी देव खाली येऊन मला सुखरूप घरी पोहचवेल‌ तर बरं होईल असं वाटायला लागले.पण एक गोष्ट माझ्या लक्षात काही येईना की एव्हढा किर्र अंधारात याला मी दिसलो कसा?आणि याला काय माहीत पुढे स्मशानभूमी आहे.कदाचीत तो भुतंच असावा कारणं भुतांना अंधारातही दिसतं म्हणून त्याने पुढे स्मशानभूमी असल्याचं अचूक सांगीतले.आता अंधारात त्याचा चेहराही दिसला नसला तरी तो जे बोलला ते खरंच होतं.बापरै मला तर माझ्या काळजावर कोणीतरी वार करून गेल्यासारखे वाटायला लागले.आता मात्र माझे पाय जड झालेत पुढे जाण्याची हिंमत होत नव्हती.अमावस्येची रात्र त्यामुळे मला वेगवेगळे भास जाणवायला लागले.हवा आणि त्यात झाडाच्या पानांचा सळसळ आवाजामुळे प्रचंड भिंती वाटायला लागली.पण घरी तर जावं लागणारं होतं ना.मी मात्र देवाचं नाव घेत मार्गक्रमण करीत राहीलो.

विचार चक्रात चालताना वाटलं स्मशानभूमी गेली असावी.पण कसलं काय मी जसं जसा पुढे जायला लागलो तर एक अक्राळविक्राळ प्रतीमा माझ्या जवळ यायला लागली,दुसरी वाट मिळते का म्हणून मी थांबलो तर ती अक्राळविक्राळ प्रतीमा ही थांबली मी पुन्हा चालायला लागलो तर ती प्रतीमा माझ्या जवळ यायला लागली छमछम आवाजाचा पाठलाग ही सुरुच होता.गार गार वारा सुरू असतानाही मी घामाने पुर्णतः ओलाचिंब झालो होतो‌ तरी जीव मुठीत घेऊन चालायला लागलो आता जे होईल ते पाहीले जाईल असं मनोमनी बोलता बोलता त्या प्रतिमेच्या जवळ येऊन पोहचलो आणि निरखून पाहिले तर काय एका शेताच्या बांधावर एक छोटस देऊळ होतं त्यात तो दिवा जळत होता मग काहीशी भिंती नाही झाली.अंधारामुळे मला वाट दिसत नव्हती तरी मी बरोबर अंदाज लावत पावले टाकत होत पण अचानक एका वळणांवर माझा पाय निसटा आणि मी खाली पडलो कोणीतरी धक्का दिल्यासारखं जाणवलं मी कोण आहे कोण आहे म्हणून ओरडायला लागलो पण अंधारामुळे काहीच दिसेना.काय कुठे पडलो काही कळतही नव्हते कसातरी चाचपडत उठलो तर काय समोर पांढरेशुभ्र वस्त्र परिधान केलेली एक उंच प्रतिमा दिसली म्हणजे आता निश्चितच भुतं आहे याची खात्री पटली मी जोरात किंचाळी फोडली आणि रडून रडून नका मारू मला नका मारू म्हणून विनंती करायला लागलो.मी रडतोय पण समोरून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता.बघू तरी कोण आहे म्हणून निरखून पाहिले तर ते शेतातल उभं केलेलं बुजगावणे होते.मग काय कसातरी स्वतःला सावरत तेथून पळ काढला.समोर लाईटांचा उजेड दिसू लागल्यामुळे आपण आता गावा जवळ पोहचलो याचा आनंद झाला. या आनंदाच्या भरात माझी पावलं भरा भरा पाळायला लागलीत.पण छमछम आवाज काही जात नव्हता शेवटी गावाच्या वेशीवर पोहचलो आणि शंभर हत्तींचे बळ अंगात संचारले,वाटलं एकदा तरी मागे वळून बघावं म्हणून मी वळून पाहीले तर काय माझ्या मागे कोणीच नाही! मग तो आवाज कोण काढत होतं ? क्षणभर विचारात पडलो.जाऊ दे मी काही जास्त खोलात गेलो नाही कारण मला लवकर घरी पोहचायचे होतं म्हणून मी घाम पुसायला खिशातून रूमाल काढला आणि माझं माझं जोरजोरात हसायला लागलो स्वतःलाच बावळट कुठला म्हणून घेतले कारणं की जो छमछम आवाज माझा पाठलाग करत होता तो कुण्या बाईच्या पैंजणीचा नव्हता तर शेतातील घराच्या चाव्यांचा झुंबर माझ्या खिशात होता त्याचा तो छमछम आवाज होता.त्यामुळे माझा गैरसमज झाला.बापरे त्या आशा एका रात्रीने माझी खूपच फजीती केली.आता कानाला खडी पुन्हा कधी अमावस्येला शेतात जायचा नाही.खरचं ती *एक रात अशी* माझ्या कायम आठवणीत राहील.

 

*संजय धनगव्हाळ*

*(अर्थात कुसुमाई)*

९५७९११३५४७

९४२२८९२६१८

प्रतिक्रिया व्यक्त करा