You are currently viewing माजगावमध्ये एसटी व ट्रकमध्ये भीषण अपघात

माजगावमध्ये एसटी व ट्रकमध्ये भीषण अपघात

माजगावमध्ये एसटी व ट्रकमध्ये भीषण अपघात

ट्रक चालक अडकल्याने गंभीर जखमी

बांदा

बांदा येथून सावंतवाडीच्या दिशेने भरधाव वेगात  जाणाऱ्या एसटीने  समोरून येणाऱ्या ट्रकला  जोरदार धडक  दिल्याने भीषण अपघात  झाला. अपघाताची भीषणता एवढी मोठी होती की, दोन्ही गाड्यांच्या केबिन  तुटून ट्रक चालक गंभीर जखमी  होऊन अडकून पडला आहे.

एसटीमधील  अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. सुदैवाने ट्रकचा क्लीनर  या अपघातातून बचावला. जखमी प्रवाशांना स्थानिकांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात  हलविले. जखमी प्रवाशांवर उपचार सुरू आहेत.

हा अपघात सव्वा चार वाजण्याच्या सुमारास  माजगाव येथील वळणावर  घडला.

प्रतिक्रिया व्यक्त करा