You are currently viewing बेळगावी येथे माजी सैनिक मेळाव्याचे आयोजन

बेळगावी येथे माजी सैनिक मेळाव्याचे आयोजन

बेळगावी येथे माजी सैनिक मेळाव्याचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी 

 जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, वीरनारी, वीरमाता, वीरपिता यांनी 15 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 8.30 ते सायं.4 वाजेपर्यंत दि मराठा लाइट इन्फट्री सेंटर, बेळगावी येथील शिवाजी स्टेडीयमवर माजी सैनिक मेळाव्याचे (ESM Rally) आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी दिली आहे.

             या मेळाव्यात विविध Records Office ची पथके, वैद्यकीय पथके उपस्थित राहणार आहेत. ही पथके सर्व माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, वीरनारी, वीरमाता, वीरपिता यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या निवृत्तीवेतन, माजी सैनिकांच्या पत्नी, वारसाच्या नावात बदल, ECHS Cards,Sparsh प्रणाली, बँकेशी निगडीत अडचणी, आधार कार्ड व त्यासंबंधी इतर अडी-अडीचणींचे निरसन करणार आहेत. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्र. 02362-228820/9420300620 वर संपर्क करावा.

जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, वीरनारी, वीरमाता यांच्या निवृत्तीवेतन, माजी सैनिकांच्या पत्नी, वारसाच्या नावात बदल ECHS Cards,Sparsh प्रणाली, बँकेशी निगडीत अडचणी, आधार कार्ड व त्यासंबंधी अडचणी असल्यास त्यांनी आपले सैन्यसेवा पुस्तक, माजी सैनिक ओळखपत्र, पीपीओ व बँक पासबुक या कागदपत्रांसह दिनांक 15 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 8 वाजता दि मराठा लाइट  इन्फट्री सेंटर, बेळगावी येथे उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा