You are currently viewing जेष्ठ साहित्यिका शैलजा करोडे, कलावंत पुरस्काराने सन्मानित

जेष्ठ साहित्यिका शैलजा करोडे, कलावंत पुरस्काराने सन्मानित

नाशिक :

दि.13 ऑक्टोंबर रोजी, कलावंत विचार मंच व कमल फिल्म प्राॅडक्शन, यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे आयोजित राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार सोहळ्यात जेष्ठ साहित्यिका शैलजा करोडे यांना कलावंत पुरस्काराने गौरविण्यात आले.

सिनेमा दिग्दर्शक अनिलकुमार साळवे, कलावंत पुरस्कार सोहळ्याचे स्वागताध्यक्ष श्री सुनीलजी मोंढे, प्रि. डाॅ. दिपाली सोसे, प्रा. सोमनाथ मुठाळ, श्री सतीश खरात या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झाला.

शैलजा करोडे यांची कवितासंग्रह, कथासंग्रह, कादंबर्‍या, चारोळीसंग्रह, भक्तीगीत संग्रह, ललितलेखन, संदर्भग्रंथ अशी 22 पुस्तकं प्रकाशित आहेत.

साहित्यिका शैलजा करोडे यांचे समाजातील विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा