You are currently viewing राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरूण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*”राष्ट्रसंत तुकडोजी महाराज”*

 

तुकडोजी महाराज होतं राष्ट्रभक्त संत

समाज उद्धार करती जनजागरणIIधृII

 

माणिक बालवयापासून विठ्ठल भक्त

गुरु अडकोजींनी ठेवले तुकडोजी नाम

मराठी हिंदी भाषेत त्यांनी लिहिले ग्रंथII1II

 

सहभागी होते तुकडोजी स्वातंत्र्य लढ्यांत

गीते लिहीती करती स्फुल्लिंग निर्माण

कारावास भोगला त्यांनी स्वदेश हितार्थII2II

 

राष्ट्र सुरक्षेसाठी मांडीला गीतेचा अर्थ

अनिष्ट चालीरीतींना करिती विरोध

सुराज्यासाठी करिती देशभर भजनII3II

 

गावोगावी भजनी मंडळे केली स्थापन

गुरुदेव सेवा मंडळाने केले जन जागृत

एकात्मिक ग्रामोन्नतिची दिली शिकवणII4II

 

भारत कृषिप्रधान व्हावा पाहती स्वप्न

आत्मनिर्भर उद्यमशील व्हावा विकसित

विश्वबंधुत्व मंत्र ग्रामगीता केली प्रदानII5II

 

राष्ट्र संतांचे कार्य विशाल साहित्य महान

स्त्री शिक्षण जागृती केली टाळीत भेदाभेद

संत तुकडोजी महाराजांना करू वंदनII6II

 

श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.

पिन.410201.Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा