You are currently viewing ज्या ठिकाणी निलेश राणे त्या ठिकाणी संजू परब..

ज्या ठिकाणी निलेश राणे त्या ठिकाणी संजू परब..

निलेश राणे यांचे कट्टर समर्थक माजी नगराध्यक्ष संजू परब उद्या शिवसेनेत प्रवेश करणार

कुडाळ :

 

उद्या होणाऱ्या निलेश राणे यांच्या शिवसेना प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांचे कट्टर समर्थक माजी नगराध्यक्ष संजू परब हे आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता ज्या ठिकाणी निलेश आणि त्या ठिकाणी संजू परब असे त्यांनी सांगितले.

माजी खासदार निलेश राणे यांचा शिवसेना प्रवेश उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित कुडाळ येथे होत आहे. या पार्श्वभूमीवर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात श्री संजू परब यांच्याकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. उद्या होणाऱ्या प्रवेशासोबत आम्ही सर्व निलेश राणे समर्थक शिवसेनेत प्रवेश करणार आहोत. ज्या ठिकाणी निलेश राणे त्या ठिकाणी संजू परब हे समीकरण आहे त्यामुळे उद्या आम्ही शिवबंधन बांधणार आहोत. मात्र भाजपा आणि महायुतीच्या नेत्यांशी आमचे संबंध कायम असणार आहेत असेही संजू परब यांनी सांगितले

प्रतिक्रिया व्यक्त करा