You are currently viewing भाजप युवा मोर्चा कणकवली शहरउपाध्यक्षपदी स्वप्नील राणे, सरचिटणीसपदी ऋषिकेश परब

भाजप युवा मोर्चा कणकवली शहरउपाध्यक्षपदी स्वप्नील राणे, सरचिटणीसपदी ऋषिकेश परब

भाजप युवा मोर्चा कणकवली शहरउपाध्यक्षपदी स्वप्नील राणे, सरचिटणीसपदी ऋषिकेश परब

कणकवली
भाजप युवा मोर्चा कणकवली शहर विस्तारीत कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली. यात युवा मोर्चा उपाध्यक्षपदी स्वप्नील (दादू) राणे, सरचिटणीसपदी ऋषिकेश (मुन्ना) परब यांची निवड करण्यात आली आहे.
उर्वरित कार्यकारणीमध्ये चिटणीसपदी ओंकार सुतार, सिध्देश वालावलकर, ऋतिक नलावडे, अवधूत तळगावकर यांचा समावेश आहे.
युवा मोर्चा कणकवली शहर बैठक येथील भाजप कार्यालयात झाली.. यावेळी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस संतोष पुजारे , जिल्हा चिटणीस गणेश तळगावकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सर्वेश दळवी, युवा मोर्चा कणकवली शहर अध्यक्ष सागर राणे, नयन दळवी आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा