You are currently viewing 19 % घोषित पगारवाढ म्हणजे निवडणुकीचा जुमला 

19 % घोषित पगारवाढ म्हणजे निवडणुकीचा जुमला 

19 % घोषित पगारवाढ म्हणजे निवडणुकीचा जुमला

सिंधुदुर्ग

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघाच्या आंदोलनाची दखल घेत मा.उर्जामंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी दि.9 सप्टेंबर रोजी वीज ऊद्योगातील कंत्राटी कामगारांना 19% वेतन वाढ एप्रिल 2024 पासून लागू करण्या बाबत घोषणा केली.

ऊर्जामंत्री यांनी प्रशासना समोर मूळ वेतनात 19 % घोषित केलेल्या पगारवाढ या शब्दाचा शब्दछळ तिन्ही वीज कंपनीच्या चाणाक्ष प्रशासकीय अधिकारी वर्गाने करून 19% पगारवाढीला निवडणूकीचा जुमला ठरवला आहे कि काय ? अशी शंका भारतीय मजदूर संघाच्या महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाला आहे.

निवडणूकी नंतर शासनाकडून किमान वेतन वाढेल व त्यानंतर जाहीर केलेली 19% वाढ रक्कम गायब होणार असल्याचे निर्मिती वितरण व पारेषण यांच्या परीपत्रकात दिसत आहे. मग याला पगारवाढ म्हणता येईल का? असा सवाल महामंत्री सचिन मेंगाळे यांनी प्रशासनाला विचारला.

शब्दछळ न करता संघटने सोबत मीटिंग घ्यावी तसेच वित्त विभागाने तातडीने कंत्राटदारांना पैसे दिल्यास तिन्ही कंपनीतील कामगारांना दिवाळी आनंदात साजरी करता येईल अन्यथा कामगार नाराज होतील व याचे विपरीत परिणाम आगामी काळात राजकीय पटलावर नक्कीच दिसतील असे अध्यक्ष निलेश खरात म्हणाले.

प्रशासनाने केलेल्या या कृत्याचा जाहीर निषेध महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने पत्राद्वारे नोंदवला असून,कामगार हितार्थ पुन्हा आंदोलनाची तयारी असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले, अशी माहिती अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष आनंद लाड यांनी दिली.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा