*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*विराम द्यायला हवा*
सततच्या विचारांना
विराम द्यायला हवा
जरा बदलावा
विषय…..
कामामागे काम
तेच ते दररोज
संपते ओज
शरीरातील….
बदल घडवावा
काही दिवस पध्दतीत
वेळ व्यतीत
आनंदाने…
निसर्ग बघावा
वाचन गायन करावे
थोडे व्हावे
निवांत…..
भेटीगाठी घ्याव्या
पर्यटन यावे करुन
विराम घेऊन
उत्साह….
ताण तणावातून
मनाला विराम द्यावा
प्रसन्न ठेवावा
मनगाभारा….
पुन्हा स्फुर्ती
विराम घेता जरा
आनंदाचा फुलोरा
फुलतो…..!!..
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
अरुणा दुद्दलवार @✍️