You are currently viewing पराभवाची हॅट्रिक करून, तेली कणकवलीला परततील

पराभवाची हॅट्रिक करून, तेली कणकवलीला परततील

*पराभवाची हॅट्रिक करून, तेली कणकवलीला परततील*

*भाजपामध्ये पद मिळाले नाही म्हणून माझ्या नावाने खडे का फोडता?*

*मंत्री दीपक केसरकर यांचा तेली ना सवाल*

*सावंतवाडी मतदारसंघाला राजघराण्याची पुण्याई; इथं अनिष्ट प्रवृत्ती रुजत नाही*

अनिष्ट प्रवृत्ती सावंतवाडीत रुजत नाही, राजन तेली हे पराभवाची हॅट्रिक करतील आणि कणकवलीला परततील, राणे साहेबांमुळे ते आमदार झाले. त्यांच्याबद्दल मला प्रश्न विचारू नका, कोण आहेत ते? अशा शब्दात मंत्री दीपक केसरकर यांनी राजन तेली यांना फटकारले. राजन तेली यांनी आता सुधाराव, तुम्हाला पद मिळालं नाही,म्हणून माझ्या नावाने खडे का फोडता? असा सवालही केसरकर यांनी केला.
देवदर्शनानंतर मंत्री दीपक केसरकर सोमवारी सावंतवाडीत परतले. जनसंपर्क कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
प्रश्नोत्तरादाखल बोलताना केसरकर म्हणाले, सावंतवाडी मतदारसंघ हा वैभवशाली आहे. शेजारी गोवा राज्य आहे. त्यामुळे इथल्या जमिनीला भाव आहे. त्यामुळे राजन तेली यांना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हवा आहे. या मतदारसंघात अनिष्ट प्रवृत्ती रुजत नाही. पराभवाची हॅट्रिक करून तेली कणकवलीला परततील.
जिल्हा परिषद निवडणुकीत पराभव झाल्यानंतर बाळ भिसे यांची निर्घृण हत्या झाली. राजन तेली आरोपी होते. पुराव्या अभावी ते निर्दोष सुटले असतील.
कोकण सिंचन मंडळाचे अध्यक्ष असताना शिरशिंगे प्रकल्पातील भ्रष्टाचाराची चौकशी सुरू होती. अशा माणसाबद्दल काय बोलावं? त्यांच्याबद्दल प्रश्न विचारून महत्व देऊ नका असेही केसरकर म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा