You are currently viewing भारताच्या प्रजासत्ताक दिनी सुरिनामचे राष्ट्राध्यक्ष मुख्य अतिथी…..

भारताच्या प्रजासत्ताक दिनी सुरिनामचे राष्ट्राध्यक्ष मुख्य अतिथी…..

 

भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळयासाठी सुरिनामचे राष्ट्राध्यक्ष चंद्रिकाप्रसाद संतोखी हे मुख्य अतिथी असणार आहेत. संतोखी हे भारतीय वंशाचे असून काही दिवसांपुर्वीच त्यांची सुरिनामच्या राष्ट्राध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. संतोखी यांचे पुर्वज शेकडो वर्षांपुर्वी भारतातून सुरिनाममध्ये राहण्यास गेले होते.

प्रजासत्ताक दिनाच्या सोहळयासाठी याआधी ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांना मुख्य अतिथी म्हणून निमंत्रित केले होते. जॉन्सन यांनीही ते स्विकारले होते, मात्र अचानक ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनचा संसर्ग वेगाने वाढू लागल्यानंतर त्यांनी काळजी म्हणून या सोहळयासाठी उपस्थित राहण्यास विनम्रपणे नकार कळवला होता. त्यानंतर यंदाचा प्रजासत्ताक दिन पाहुण्यांविनाच साजरा होणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र त्यावर आता पडदा पडला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा