You are currently viewing हरवलं आपलेपण..

हरवलं आपलेपण..

*मनस्पर्शी साहित्य परिवाराच्या सन्माननीय सदस्य जेष्ठ कवयित्री अरुणा गर्जे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*हरवलं आपलेपण…*

 

येता जाता विचारीत असतं

एकांतात माझं खट्याळ मन

वाटते का रे तुलाही असंच

हरवलं आहे आपलेपण

 

छे रे! काही काय म्हणतोस

मला नाही वाटत तसं

जो तो आपल्या कामात गर्क

मला तर वाटतं नेहमीच असं

 

विचारे न का कुणी आपल्याला

आपणच बोलावे स्वतःहून त्याला

नाही बोलणार एखादेवेळेस

शिकावे नजरअंदाज करायला

 

आता परत म्हणशील तू

मान ना मान मै तेरा मेहमान

पण असं काही नसतं मना

उगाच माजवतो आपण रान

 

पण खरं सांगू तुला मना

जाणवतो मलाही एकलेपणा

पोकळ दिखाव्याचे शब्द

अन् उरला फक्त दांभिकपणा

 

तेवढ्यापुरताच आनंद

थोड्यावेळच तो दुखवटा

हरवलं आहे आपलेपण

उरल्या फक्त समांतर वाटा

 

@अरुणा गर्जे

नांदेड

प्रतिक्रिया व्यक्त करा