मुंबई :
माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आपल्या समर्थकांसोबत आज ठाकरे सेना पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबई मातोश्रीवर हा प्रवेश केला. यावेळी शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर, माजी खासदार विनायक राऊत, संजय पडते, सतीश सावंत, संदेश पारकर, अतुल रावराणे, संग्राम प्रभूगावकर आदी उपस्थित होते.
स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने विधानपरिषद सदस्य झालेल्या माजी आमदार परशुराम उपरकर यांनी तब्बल १२ वर्षांनी पुन्हा ठाकरे शिवसेनेत स्वगृही प्रवेश केला आहे.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपरकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले. उपरकर यांच्यासह त्यांचे समर्थक आशिष सुभेदार, बाबल गावडे, दीपक गावडे, आप्पा मांजरेकर, राजेश टंगसाळी, विनोद सांडव, नाना सावंत, आबा चीपकर, शैलेश मयेकर, मंदार नाईक, अभय देसाई, प्रकाश साटेलकर, सुरेंद्र कोठावळे, मनोज कांबळी, संदीप लाड, सचिन मयेकर, विजय उपरकर, प्रणव उपरकर यांच्यासह मोठ्या संख्येने समर्थ उपस्थित होते.