You are currently viewing कामधेनू शेतकरी गट, गोठोस व नॅब नेत्ररुग्णालय, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने गोठोस येथे मोफत नेत्रतपासणी शिबीर संपन्न 

कामधेनू शेतकरी गट, गोठोस व नॅब नेत्ररुग्णालय, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने गोठोस येथे मोफत नेत्रतपासणी शिबीर संपन्न 

कामधेनू शेतकरी गट, गोठोस व नॅब नेत्ररुग्णालय, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने गोठोस येथे मोफत नेत्रतपासणी शिबीर संपन्न

सावंतवाडी

कामधेनू शेतकरी गट, गोठोस व नॅब नेत्ररुग्णालय, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने गोठोस येथे दि. १५/१०/२०२४ रोजी मोफत नेत्र तपासणी शिबीर घेण्यात आले. सुरुवातीला दिपप्रज्वलाने उद्घाटन करण्यात आले . संस्था सचिव श्री. सोमनाथ जिगजिन्नी यांनी नॅब संस्थेची माहिती दिली. अध्यक्ष श्री अंनत उजगांवकर यांनी संस्थेच्या कार्याविषयी माहिती दिली. सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत शिबीर चालले याचा ११८ लाभार्थीनी लाभ घेतला. सवलतीच्या दरात चष्माचे वाटप करण्यात आले. मोतीबिंदू बऱ्याच जणांना आहे असे निदर्शनास आले. याचे प्रबोधन करण्यात आले. त्यांना यावर शस्रक्रियेसाठी संस्थेच्या सावंतवाडी येथील रुग्णालयात येण्यास सांगितले या ठिकाणी सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. यासाठी संस्था गाडीने रुग्णांना येण्या-जाण्याची व्यवस्था करणार आहे. या शिबीरासाठी कामधेनू शेतकरी गट व नॅब नेत्ररुग्णालय, सांवतवाडी यांनी विशेष मेहनत घेतली. अध्यक्ष श्री विष्णू तामाणेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर श्री. एकनाथ मेस्त्री यांनी आभार प्रदर्शन केले. *घरी बनविलेले पुष्पगुच्छ विशेष आकर्षण ठरले.*

प्रतिक्रिया व्यक्त करा