You are currently viewing दोडामार्ग व सावंतवाडीतील १२ गावात वृक्षतोडीस बंदीसाठी “टास्क फोर्स”

दोडामार्ग व सावंतवाडीतील १२ गावात वृक्षतोडीस बंदीसाठी “टास्क फोर्स”

दोडामार्ग व सावंतवाडीतील १२ गावात वृक्षतोडीस बंदीसाठी “टास्क फोर्स”

सावंतवाडी

दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यातील एकूण १२ गावांमध्ये वृक्षतोडीस बंदी घालण्यात आली असून अवैधरित्या होणाऱ्या वृक्षतोडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी “टास्क फोर्स” समिती तयार करण्यात आली आहे.

या समितीत महसूल, वन व पोलिस विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.समितीच्या अध्यक्षपदी उपविभागीय अधिकारी सावंतवाडी असून सदस्य सचिव सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे आहेत. तसेच समितीमध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद कांबळे, सावंतवाडी तहसिलदार श्रीधर पाटील, दोडामार्ग वनपरिक्षेत्र अधिकारी वैशाली मंडल सावंतवाडीवनपरिक्षेत्र अधिकारी नेहा वानरे, आंबोली वनपरिक्षेत्र अधिकारी अमित कटके, सावंतवाडी पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण दोडामार्ग पोलिस निरीक्षक, हे सदस्य आहेत.

दरम्यान सावंतवाडी-दोडामार्ग टास्क फोर्स समितीच्या वतीने कळविण्यात येते की, दोडामार्ग तालूक्यात कोठेही गावात खाजगी मालकी किंवा शासकीय क्षेत्रात वृक्षतोड झालेली किंवा वृक्षतोड होताना निदर्शनास आल्यास या घटनेबाबत जनतेने गावातील पोलिस पाटील, वनरक्षक, तलाठी यापैकी कोणालाही तातडीने कळवावे. जेणेकरून वनविभागाकडील अधिकारी वा कर्मचारी घटनास्थळी जावून तात्काळ चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करतील. तसेच अशा चौकशी प्रकरणामध्ये शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना क्षेत्रीय स्तरावर नागरीकांनी आवश्यक ते सहकार्य करण्यात यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. वृक्षतोड बाबत ऑनलाईन तक्रारीसाठी सावंतवाडी-दोडामार्ग टास्क फोर्स समीतीचा ईमेल आयडी तयार करण्यात आलेला असून सदरचा ईमेल आयडी sdtfsawantwadi@ gmail.com असा आहे. या ईमेल वर आपण वृक्षतोडीच्या घटनाबाबत तक्रार दाखल करता येते. तसेच वृक्षतोड बाबत तक्रारीसाठी सावंतवाडी वनविभाग यांचेकडे दूरध्वनीव्दारेही तक्रार दाखल करता येणार आहे. तरी सर्वांना आवाहन करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा