श्री रासाई युवा कला क्रीडा मंडळ सावंतवाडी (लाखे वस्ती ) येथील युवकांनी जपली खरी सामाजिक बांधिलकी.
देवीकडे जमलेलं अन्नधान्य सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान व सविता आश्रमला दिलं.
सावंतवाडी
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून तालुक्यातील नवरात्र उत्सव मंडळांना एक आवाहन केलं होतो की निराधार व गोरगरीब व्यक्तींसाठी देवीकडे जमा झालेले अन्नधान आमच्या सामाजिक बांधिलकी संस्थेकडे द्याव जेणेकरून आम्ही ते धान्य गोरगरिबापर्यंत पोहोचवून त्याची पोचपावती आपल्याला देऊ अशी मागणी संस्थेच्या रवी जाधव यांनी मंडळांकडे केली होती.
या मागणीचा गांभीर्याने विचार करून श्री रासाय युवा कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष कृष्णा लाखे यांनी सढळहस्ते सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडे 70 नारळ, 25 किलो तांदूळ ,
20 किलो कडधान्य, 5 किलो रवा, तेल, डालडा अशा विविध वस्तू निराधार व गोरगरीब कुटुंबीयांना देण्यासाठी सामाजिक बांधिलकीकडे जमा केलेले आहेत. या वस्तूं सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून दहा कुटुंबांना पोहोचवल्या जाणार आहेत. श्री रासाई युवा कला क्रीडा मंडळाच्या या सेवाभावी कार्यकर्त्यांचे अध्यक्ष सतीश बागवे व कार्याध्यक्ष संजय पेडणेकर यांनी मनःपूर्वक आभार मानून त्यांचे कौतुक केले आहे.
याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष कृष्णा लाखे, उपाध्यक्ष विकी लाखे, खजिनदार लखन पाटील, कार्याध्यक्ष रोहित लाखे, अंकुश लाखे, गणेश खोरागडे, साई लाखे, कुणाल पाटील, अविनाश खोरागडे व ज्येष्ठ नागरिक रघुनाथ लाखे उपस्थित होते.