You are currently viewing फिरतीचा पाऊस

फिरतीचा पाऊस

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री चित्रकारा स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*फिरतीचा पाऊस*

 

येतोस कां रे पावसा

सारखा सारखा,

दिवस तुझे संपले तरी

हौस तुला भारी,

दुपार संपली की,आली

तुझी धडकती स्वारी,

रखरखाटात पडत नाही

चिखलात उडी मारी.

 

अवकाशात वीजांचाहोई

जोरात कडकडाट,

धक्काबुक्कीत चालेखेळ

ढगांचा गडगडाट,

वामकुक्षीतून उठून दारे

खिडक्या बंद करा,

वेड्यासारख्या मारीत उड्या तुझा थयथयाट.

 

दिवस तुझे संपले तरी

हौस तुझी भागेना,

रेनकोट टाकलेस फाडून

छत्र्या गेल्या मोडून,

छपरावरची कौले फुटली

पत्रेपण गेले उडून,

एकसारखेपैसेतूचसांगआणायचे तरी कुठून.

 

भरदुपारी,रात्रीतुलाकाही नसते काळवेळ,

नसतेआॅफिस,नाहीशाळा

हवा तेवढा घाल गोंधळ

आम्ही काय करायचे,

रोज मारु दांड्या?

नाहीपैसाअडका,उनाडत फिरु कां गल्ली बोळ ?

 

🌧️⛈️🌨️🌩️🌦️⛈️🌧️

थांब ना रे पावसा!

🪷🪷🪷

स्वप्नगंधा सतीश आंबेतकर

विरार

प्रतिक्रिया व्यक्त करा