You are currently viewing जैसे बीज तैसे फळ

जैसे बीज तैसे फळ

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*जैसे बीज तैसे फळ*

 

नियम सृष्टीचा

बीज तैसे फळ

विश्वात सकळ

निसर्गाचा…..

 

जसे खावे अन्न

घडे तैसे मन

सांगे संत जन

सकलांसी……

 

संस्कार संपन्न

घडवा पिढीला

वाट आयुष्याला

यथोचित….‌

 

पक्षिणीप्रमाणे

पिल्लांवर लक्ष

नाही तर भक्ष्य

कुसंगती…..

 

भांडण विवाद

सतत टाळावे

प्रेमाने वागावे

क्षमाशील…..

 

दावू कृतीतून

वागणे बोलणे

करू या शहाणे

पिढीस या….

 

अवलोकनाने

शिकतात मुले

गंधित फुले

ज्ञानवृक्षी……

 

 

अरुणा दुद्दलवार @✍️

प्रतिक्रिया व्यक्त करा