*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*
*निर्भय*
निःशब्द उभी होतीस तू
अन्याय हाती घेऊन
सोडली डोळ्यावरची पट्टी
संविधान हाती देऊन
आदेशाच्या कलमांनी
गुलाम तुला केली
अत्याचार दिसू नये म्हणून
गांधारी तू झाली
अमानूषतेच्या नजरेतून
किती लादले गेले गुन्हे
पाहून घे डोळेभरून
त्या शापितांचे जगणं
निषेधाच्या मेणबत्या
कितीदा वितळून गेल्या
गर्भार झाल्या जखमा
वेदना घेऊन जळाल्या
डोळ्यावरची पट्टी काढून
आता मुक्त केली तुला
सत्यमेव जयतेचा
यथार्थ विजय झाला
आता फक्त तू न्यायच करशील
अन्याय नको होऊ देवूस
पुन्हा कुणाच्या आयुष्याचे
लक्तरे नको पाहूस
*संजय धनगव्हाळ*
*(अर्थात कुसुमाई)*
९५७९११३५४७
९४२२८९२६१८