You are currently viewing उद्धव ठाकरे यांनी भाजप ला फ्लॉवर समजू नये आम्ही फायर आहोत..!

उद्धव ठाकरे यांनी भाजप ला फ्लॉवर समजू नये आम्ही फायर आहोत..!

उद्धव ठाकरे यांनी भाजप ला फ्लॉवर समजू नये आम्ही फायर आहोत..!

*भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी दिला इशारा

*मैदानात हरविण्याची ताकद उबाठा त नाही

* शरद पवार, नाना पटोले ठाकरेंचे रोज कपडे फडात आहे तरी ठाकरे मुख्यमंत्री पदाची स्वप्न पहत आहे

कणकवली
उद्धव ठाकरे यांनी कितीही पाळीव प्राणी आमच्यावर सोडले तरी त्याचा आमच्यावर फरक पडणार नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष हा भक्कम आहे. भारतीय जनता पक्षाला उद्धव ठाकरे यांनी फ्लॉवर समजलं काय ? आम्ही फायर आहोत हे उद्धव ठाकरेंनी लक्षात ठेवाव.ते आम्हाला मैदानात हरवू शकत नाहीत म्हणून अशा गोष्टी ते करत असतात.तेव्हा दिवाळीच्या अगोदर फटाके कसे फोडायचे हे महा युतीच्या नेत्यांना माहित आहे. असा इशारा भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी दिला.
जेव्हा आम्हाला मैदानात हरवू शकत नाहि तेव्हा संजय राऊत सारखे तीनपट आमच्यावर खोटे नाटे आरोप करतात.कायतरी बोलून आपली प्रसिद्धी करून घ्यायची. शिवसेना उबाठा ही डी कंपनी आहे काय ? अस आम्ही म्हणायचं का ? असा सवाल आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर उपस्थित केला. यावेळी ते कणकवली येथील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
पुढे आ. नितेश राणे म्हणाले, हिंदू द्वेष करणं किंवा हिंदूंना टार्गेट करणे, पाकिस्तानचे झेंडे फडकवणे, पाकिस्तान जिंदाबाद म्हणणं हे सगळं दाऊद गँगचे गुण उबाठा सेनेने घेतलेले आहे. दुसऱ्यांना कोणत्याही गँग ची उपमा देण्यापेक्षा तुमच्या उबाठा सेनेची डी कंपनी झालेली आहे. त्यावर पहिले लक्ष टाका आणि नंतर आम्हाला नाव ठेवा, असा टोला आमदार नितेश राणे यांनी लगावला आहे.
मी राहुल गांधींना फोन केलेला एक तरी रेकॉर्डिंग राऊतांनी जाहीर करावं. मिळालेल्या माहितीनुसार संजय राऊत यांचा फोन राहुल गांधी घेत नाही. दहा जनपथ च्या ऑपरेटर पर्यंत राऊतांचा फोन जातो आणि इकडे मोठ्या बाता करतात. त्यामुळे संजय राऊत यांनी लायकीप्रमाणे महाराष्ट्र मधील नेत्यांशी बोलावे. कारण दिल्ली तुमच्याप्रमाणे वर्षानुवर्षे काँग्रेसचे राजकारण बदललेलं नाही. काँग्रेसची प्रत्येक यादी दिल्ली वरून ठरते. कितीही इथे तोंड फाटक्यासारखे बोलत बसलात तरी तूमच्या म्हणण्याप्रमाणे काँग्रेस ची यादी महाराष्ट्रातून ठरत नाही. म्हणून परत परत जाऊन दिल्लीत मुजरा करावा लागणार त्याला पर्याय नाही.
राजन तेलिंच्या पक्षप्रवेशा बाबत पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर आ. नितेश राणे म्हणाले, दर पाच वर्षानंतर असे प्रवेश कोणीतरी करतात. पहिले परशुराम उपरकर होते, सतिश सावंत होते आता हे राजन तेली आहेत.
सावंतवाडी, वेंगुर्ले आणि दोडामार्ग मध्ये एक उमेदवार नाही. जो आमच्या महायुतीच्या उमेदवाराला हरवू शकेल. एक कडवट शिवसैनिक नाही जो महायुतीच्या उमेदवारासोबत लढू शकतो. हे खरंतर आश्चर्याची गोष्ट आहे.
काल शरद पवार यांनी ईश्वरपूर मध्ये राहून उद्धव ठाकरेंच्या सणसणीत कानाखाली मारली आहे ? किती दिवस,रात्र मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न पहायचे. आपल्या आजूबाजूच्या नातेवाईकांना मीच मुख्यमंत्री बनणार असे सांगत सुटलेले आहेत.ठाकरेंचे शरद पवार, नाना पटोले यांचे रोज कपडे फाडण्याचे काम करत आहेत. म्हणजे उद्धव ठाकरेंनी लायकी काय आहे हे आम्ही बोलण्यापेक्षा महाविकास आघाडीचे मित्रपक्ष दाखवत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा