You are currently viewing अभिजात मराठी

अभिजात मराठी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री स्मिता रेखडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*” अभिजात मराठी “*

 

अभिजात मराठी वांग्डमयीन अविष्कार

मराठीचा सार्थ अभिमान देवता समान

भाषा,लिखाण दैनंदिन बोली मातृभाषा

ग्रंथसंपदा,वेद,साहित्य विपुलता पुरातन ||१||

 

क्षर म्हणजे नष्ट,अक्षर म्हणजे नष्ट न होणारे

इतिहास साक्षी अडीच हजार वर्षापूर्वीचा

ज्ञानेश्वर माऊलींच्या रचनेचा फडके झेंडा

गर्व आहे अमृताशी पैजा जिंकणारी मराठीचा ||२||

 

माझ्या मराठीची बोल कौतुके अमृतात रसाळ

रामायण, महाभारताचे झाले अन्य भाषातंर

भारूड,अंभग,दिंडी,ओवी,गवळण ती सुबत्ता

मुलायम पदर अभिजात व्याकरण, अंलकार ||३||

 

शंकराचार्य म्हणे मराठी भाषेत वसे ज्ञान

मातृभाषेतून घेता ज्ञान मिळे मानाचे स्थान शिलालेख,ताम्रपट,आज्ञापत्रे,बखर,फर्मान

पुढील पिढीत संस्कारातुन झिरपे ठेवा पुरातन ||४||

 

ग्रथंपरंपरेची दिंडीने मराठीचे गौरव पुजन होई

विकास, संस्कार घडवण्यात मोलाचा वाटा असे

चित्रपट, नाटके,गाणी साहित्यात ओलावा वसे

भावना व संवेदना यांची झालर ही तर अभिजात ||५||

 

शाळा,महाविद्यालय,व्यवहारात करावा वापर

ग्रामीण शहरी भेद न होता देश गौरवशाली होईल

विज्ञान मराठीत शिकवता वाढ होई कौशल्यात

विविध प्रांती मराठी बोलीतून प्रगल्भता झळकेल ||६||

 

मराठी भाषा लिपी प्रगत राष्ट्र निर्मितीत मोलाची

स्पर्धेत टिकण्या करावी इंग्रजी भाषा आत्मसात

धन्यता होतसे मातृभाषेला दैवत मानुन पुजायला

मराठीचे गोडवे,संवर्धन विकास सुंदरता सोबत ||७||

 

सर्वांगीण विकास, विचारांचे वैभव ही सुबत्ता

व्याकरणदृष्ट्या हानी मराठीची जरी होत असे

तिच्यातील चेतना जागृत ठेवण्यासाठी झटता

संस्कृत,हिन्दी सहज उमजे मराठी ज्याला येतसे ||८||

 

महाराष्ट्रात अभिजात मराठी प्रथम दर्जा मिळता

भाषा माध्यमाच्या घोळात मराठी सक्तीचे करावे

ज्ञानेश्वर ते सद्य साहित्यीक मराठी भाषेचे पुजक

शिक्षणाने देशाच्या प्रगतीत मैलाचा दगड ठरावे ||९||

 

भाषा बोली लिखाणातुन व्यक्त होई भावसौंदर्य

इंटरनेट वर मराठी अनुवाद गौरवास्पद ठरता

कुसुमाग्रजांचा जन्मदिन असे राज्यभाषा दिन

आई सम जवळची भाग्य लाभते मराठी बोलता ||१०||

 

सौ. स्मिता श्रीकांत रेखडे.नागपूर

प्रतिक्रिया व्यक्त करा