You are currently viewing श्री गजानन महाराजांची स्वरचित आरती

श्री गजानन महाराजांची स्वरचित आरती

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा लालित्य नक्षत्रवेल समूह सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.मंजिरी अनसिंगकर लिखित अप्रतिम आरती*

 

*श्री गजानन महाराजांची स्वरचित आरती*

 

जयजयजी गुरुराज जय जय गुरूराया

अवतरलासी भूवरी भक्ता ताराया जय जय गुरूराया ॥धृ||

 

 

निर्गुण ओंकारा, धारीसी सगुण रूपा

लीला दाविसी तू,आपुल्या निजभक्ता

वारिसी संकटा,तारिसी भक्तजना

जाणो मी ही रे! अगाध तव सत्ता—१

जयजयजी गुरुराज जय जय गुरूराया

झिजविन मीही काया सेवा तव पाया जयजयगुरूराया

 

गण गण गणांत बोते मंत्र हा तारक

ध्यानी मनी जपू दे, दुष्टतत्व मारक

सुख आनंदाची होईल बरसात

श्रद्धा अपार ठेवी,आहे सुखकारक—

जयजयजी गुरुराज जय जय गुरूराया

सोडवी मोह माया,धरी कृपाछाया

जय जय गुरूराया||२||

 

आदि तूssअनादी अनंत गुरूतत्व

भक्तासाठी तूss साक्षात भगवंत

तव लीलेचा न लगे , आम्हा हो अंत

निष्ठावंतांचा तू,असे कृपावंत

जयजयजी गुरुराज जय जय गुरूराया

नित राही लीन,तारी शरणागताया

 

सौ.मंजिरी अनसिंगकर

नागपूर.‌

प्रतिक्रिया व्यक्त करा