You are currently viewing कोलगाव निरुखेवाडीत विहिरीत पाय घसरून पडल्याने तरुणाचा मृत्यू

कोलगाव निरुखेवाडीत विहिरीत पाय घसरून पडल्याने तरुणाचा मृत्यू

कोलगाव निरुखेवाडीत विहिरीत पाय घसरून पडल्याने तरुणाचा मृत्यू

सावंतवाडी

कठडा नसलेल्या विहिरीत पाय घसरून पडल्यामुळे कोलगाव निरुखे येथील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. नारायण उर्फ प्रसाद व्यंकोजी राऊळ (४२) असे त्याचे नाव आहे. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. प्रसाद राऊळ हा तरुण बुधवारी सायंकाळी उशिरा घराबाहेर पडला होता. मात्र , उशिरापर्यंत तो घरी न परतल्याने शोधाशोध करण्यात आली. त्यानंतर शोध घेत असताना गुरुवारी सकाळी घरापासून काही अंतरावर असलेल्या कठडा नसलेल्या विहिरीत त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला.

या घटनेची माहिती तरुणाचे काका आनंद नारायण राऊळ यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात देताच सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, उपनिरीक्षक माधुरी मुळीक, पोलीस हवालदार अनिल धुरी, संतोष गेलोले यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह विहिरीतून बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर दुपारी कोलगाव येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान , सदर तरुणाचा मृत्यू हा पाण्यात बुडून झाल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट करण्यात आल्याने आकस्मित मृत्यू म्हणून नोंद केल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई-वडील, भाऊ, बहिणी, काका, काकी असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा