सावंतवाडी :
तालुक्यातील कोलगाव येथे २० ऑक्टोबर रोजी मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबीर, तसेच मोफत औषधे उपलब्ध करण्यात येत आहे. मल्लसम्राट प्रतिष्ठान, सावंतवाडी व अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, धारगळ – गोवा यांचे संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन आले आहे, असे मल्ल सम्राट प्रतिष्ठानचे अध्यक्ष जावेद शेख, सचिव ललित हरमलकर, खजिनदार गौरव कुडाळकर यांनी सांगितले.
आरोग्य शिबिरामधील उपलब्ध सेवा:
१. हृदयरोग
२. उच्च रक्तदाब
३. एलर्जी व दमा श्वसन विकार
४. अन्य जुनाट विकार
५. त्वचा विकार
६. लिव्हर व किडनी विकार
७. हाडांचे व सांध्यांचे आजार
८. पॅरॅलिसिस
९. वात विकार
१०. मुळव्याध
११. मधुमेह
१२. थायरॉईड
१३. बालरोग
१४. स्त्री रोग
शिबिरात मोफत औषधे उपलब्ध करून दिली जातील.
अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक
🏵️ दशरथ – 9405399156
🏵️ दादू – 9145253025
वेळ – दिनांक २० ऑक्टोबर सकाळी ९:३० ते दुपारी ०१:३० वाजेपर्यंत
स्थळ – कोलगाव विकास सोसायटी हॉल, कोलगाव, सावंतवाडी