फोंडाघाट मध्ये ढगफुटी सदृष्य पाऊस
हवेली नगर मध्ये वीज पडून माडाने घेतला पेट
फोंडाघाट
*फोंडाघाट मध्ये ढगफुटी सदृष्य पाऊस झाला. कालच्या कोजागिरी पोर्णिमा वर सुध्दा पावसाचे सावट होते. आज सकाळपासुन गडगडासह परतीचा पाऊस सुरू आहे. बळीराजा हवालदिल झाला असून हाता तोंडाशी आलेलं भात शेती पिकाचे होणार मोठ्ठे नुकसान झाले आहे. निवडणुक आचारसंहाते मुळे पंचनामेही होणार कि नाही याचा बळीराजाला ध्यास घेतला आहे. सकाळ पासुन सलगं २ ते ३ तास पाऊस झाला. दिवाळीच्या पुर्व संधेला बाजारपेठेतही शुकशुकाट असतो. आता पाऊस गेला पाहीजे, असे सर्वांनी मत व्यक्त केले. देवाला साकडं घालणं हाच एक पर्याय आहे असे अजित नाडकर्णी म्हणाले.
आत्ताच हवेली नगर माडावर वीज पडुन पुर्ण माड पेटला.