You are currently viewing आर.पी.आय.(आठवले) पक्षाचे कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीर

आर.पी.आय.(आठवले) पक्षाचे कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीर

आर.पी.आय.(आठवले) पक्षाचे कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीर

सावंतवाडीत 20 ऑक्टोबरला, 19 ऑक्टो.ला दोडामार्गात बैठक

सावंतवाडी

भारतीय संविधानाचे शिल्पकार,भारतरत्न -डॉ.बाबासहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ची चळवळ अधिक गतिमान बनविण्याच्या तसेच महत्वपूर्ण निर्णय घेण्याच्या हेतूने येत्या रविवार दि.20 ऑक्टोबर 2024 रोजी पक्षाचा युवक,युवती ,महिला व पक्ष कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीर सावंतवाडी येथील मँगो हॉटेल हॉल मध्ये आयोजित करण्यात येत असल्याने कार्यकर्त्यांने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पक्षाचे जिल्हाध्यक्ष -अजीतकुमार कदम यांनी बैठकीत केले.
पक्षाची नियोजनासाठी नुकतीच बैठक पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव मा.रमाकांत जाधव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व पक्षाचे जिल्हाध्यक्ष -मा.अजीतकुमार कदम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
बैठकीत जिल्हा सरचिटणीस -प्रकाश कांबळे,जिल्हाकार्याध्यक्ष- सखाराम कदम,जिल्हा उपाध्यक्ष-चंद्रकांत जाधव, जिल्हा खजिनदार-आनंद पेंडूरकर ,सौ.ज्योती रमाकांत जाधव नगरसेविका,नगर पंचायत दोडामार्ग, ॲड.एस.के.चेंदवणकर,
दोडामार्ग तालूका अध्यक्ष -रामदास कांबळे,सावंतवाडी तालूका अध्यक्ष -संतोष जाधव,दोडामार्ग तालूका सरचिटणीस-नवसो पावसकर,कार्याध्यक्ष-प्रेमानंद पालेकर,उपाध्यक्ष-सत्यवान पालयेकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
शिबीर नियोजनासाठी शनिवार दि.19 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 2 .00 वा.दोडामार्ग येथील स्नेह रेसिडन्सी हॉटेल मध्ये पक्षाच्या तालूका कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात येत असल्याची माहिती पक्षाचे तालूका अध्यक्ष -रामदास कांबळे यांनी दिली व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

______________________________
*संवाद मीडिया*

*सुयश इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स कुडाळ* (c/o Suyash multispeciality hospital Kudal)

कॉलेज किंवा नोकरी सांभाळून करता येण्यासारखे कोर्सेस
https://sanwadmedia.com/149070/

🩸 *दहावी नंतरचे कोर्सेस :* 🩸

🔬 *CMLT* (Certificate Course In Medical Lab Technology)

🧑‍🦼 *CDT* (Certificate In Dialysis Technician)

🎞️ *CXRT* (Certificate In X-ray Technician)

✂️ *COTT* (Certificate In Operation Theatre Technician)

👓 *COT* (Certificate In Ophthalmic Technician)

🩸 *बारावी नंतरचे कोर्सेस* 🩸

🔬 *DMLT* (Diploma In Medical Lab Technician)

🧑‍🦼*DTT* (Diploma In Dialysis Technician)

🎞️ *DXRT* (Diploma In X-ray Technician)

✂️ *DOTT* (Diploma In Operation Theatre Technician)

👓 *DOT* (Diploma In Ophthalmic Technology)

🧬 *आमची वैशिष्टे* 🧬

💸 माफक फी (39000)*
📚 उच्चशिक्षित शिक्षक
🌡️ मोफत प्रात्यक्षिक अनुभव
🏥 हॉस्पिटल अटॅचमेंट
🧑‍🔬 १००% नोकरीची हमी
📜 मान्यता प्राप्त सर्टिफिकेट

📍 *आमचा पत्ता :* सुयश हॉस्पिटल, कुडाळ एस.टी. स्टँड समोर, कुडाळ, सिंधुदुर्ग

☎️ 02362 – 223452
☎️ 02362 – 221358
📲 9422436933

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/149070/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा