You are currently viewing हणमंत वडिये येथे विशेष महिला मेळावा संपन्न, महिलांच्या आरोग्य व सक्षमीकरणावर मार्गदर्शन

हणमंत वडिये येथे विशेष महिला मेळावा संपन्न, महिलांच्या आरोग्य व सक्षमीकरणावर मार्गदर्शन

**हणमंत वडिये येथे विशेष महिला मेळावा संपन्न, महिलांच्या आरोग्य व सक्षमीकरणावर मार्गदर्शन**

हणमंत वडिये, ता. कडेगांव येथे येरळामाई जनसहयोग फाऊंडेशनच्या वतीने आयोजित विशेष महिला मेळावा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या डॉ. सौ. अंकिता पाटील यांनी महिलांच्या आरोग्यविषयक महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. “घर निरोगी ठेवायचे असेल, तर स्त्रियांनी स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य द्यायला हवे,” असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. डॉक्टर म्हणून आलेल्या अनुभवांवर आधारित, त्यांनी महिलांच्या आरोग्यविषयक विविध पैलूंवर प्रकाश टाकला.

कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या सौ. दीपाली दंडवते यांनी महिलांच्या सुरक्षा आणि सक्षमीकरणावर POSCO ACT संदर्भात विचार मांडले. महिलांनी आपले हक्क ओळखून, समाजात सुरक्षिततेची जाण ठेवून पुढे जाण्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. अनुराधा पाटील (माई) यांनी महिलांनी स्वतःच्या प्रगतीसाठी प्रयत्न करत राहण्याची भावना व्यक्त केली. याशिवाय, सौ. सोनाली मोरे, सौ. पूनम मोरे, सौ. सीमा मोरे, आणि सौ. स्मिता मोरे यांनी देखील महिलांच्या सक्षमीकरणाबद्दल आपले विचार मांडले.

या मेळाव्यासाठी हणमंत वडिये गावातील शंभरहून अधिक महिलांनी सहभाग घेतला. ग्रामपंचायत सदस्या सौ. सुरेखा कुंभार, सौ. धनश्री मस्के, सौ. राजश्री सकटे, आणि सौ. नम्रता जाधव यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका सौ. माधुरी मस्के यांनी केले, तर येरळामाई जनसहयोग फाऊंडेशनचे खजिनदार श्री. प्रदीप मस्के, सदस्य श्री. जोतीराम देशमुख, आणि सहसचिव श्री. विजय मस्के यांनी आयोजनाची जबाबदारी सांभाळली.

कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली आणि कु. गार्गी जाधव हिने दिलेल्या मानवंदनेने सांगता करण्यात आली. संस्थेच्या महिला अध्यक्षा सौ. मयुरा जाधव यांनी प्रास्ताविक केले आणि आभार मानले.

______________________________
*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध🔹मधातला आवळा*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ🔸गावठी सुरय तांदूळ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ🔸कडवे वाल*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन🔸पेणचे पांढरे कांदे माळ*
*🔸 मालवणी मसाला🔸खडा मसाला*
*🔸 भिमसेनी कापुर🔸मकाना🔸काजुगर*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*

प्रतिक्रिया व्यक्त करा