You are currently viewing जपावे लागते

जपावे लागते

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य लेखक कवी प्रकाश क्षीरसागर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*जपावे लागते*

 

सज्जनांना रोज भ्यावे लागते

दुर्जनांना का नमावे लागते

 

 

मी कुठे सत्यास आहे टाळले

रोज मिथ्या पण वदावे लागते

 

 

बदलती अपुली जबानी माणसे

सत्य न्यायाला जपावे लागते

 

 

काल जे होऊन गेले ते विसर

वर्तमानाला भिडावे लागते

 

 

कोणता दर्या असे लाटेविना

भोवरा टाळून जावे लागते

 

#. सागर प्रकाश

प्रकाश रामचंद्र क्षीरसागर ताळगाव पोस्ट-करंजाळे गोवा

प्रतिक्रिया व्यक्त करा