कुडाळ:
महेंद्रा अकॅडमीचा विद्यार्थी सर्वेश मांडेलकर याची नुकतीच अग्निवीर (इंडियन आर्मी) दलामध्ये निवड झालेली आहे.म्हणून महेंद्रा अकॅडमी तर्फे सर्वेशचा अकॅडमी तर्फे विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सावंतवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री प्रमोद पाटील साहेब तसेच N.S.G कमांडो भाऊ सावंत सर, अकॅडमीचे संचालक महेंद्र पेडणेकर सर, अकॅडमीचे ग्राउंड प्रशिक्षक बापू परब सर तसेच बाकी सर्व पोलीस तसेच आर्मी भरतीची तयारी करणारे विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील साहेबांनी विद्यार्थ्यांना बहुमूल्य असे मार्गदर्शन केले आणि सर्वेश सारखे आणखीन बरेच विद्यार्थी हे अकॅडमीच्या माध्यमातून भरती होऊन दे आणि कोकणात देखील तशा प्रकारचं वातावरण तयार होऊन दे अशी आशा व्यक्त केली.