सिंधुदुर्गनगरी :
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमार्फत नव्याने भरण्यात आलेल्या समुदायीक आरोग्य अधिकारी Community Health Officer (CHO) यांच्या नियुक्ती संदर्भातील महत्वाचा मुद्दा आज मार्गी निघाला असून यांच्या नियुक्ती पत्रांवर जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वाक्षरी करत त्यांच्या नेमणुकीसंदर्भातील आदेश दिले आहेत. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३५ पेक्षा जास्त स्थानिक युवक युवतींचा नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.
या संदर्भात कालच निलेश राणे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांची भेट घेतली होती, त्या नंतर मकरंद देशमुख यांनी तत्काळ कार्यवाहीचे आदेश देत सर्व प्रक्रिया पूर्ण करून आज नेमणूक दिली आहे.