You are currently viewing प्रत्येक गावच्या विकासात आ. नितेश राणे यांचा फार मोठा वाटा – शारदा कांबळे

प्रत्येक गावच्या विकासात आ. नितेश राणे यांचा फार मोठा वाटा – शारदा कांबळे

मौंदे येथे स्ट्रीट लाईट व रस्ता कामाचा शुभारंभ.

वैभववाडी
मौंदे येथे स्ट्रीट लाईट या विकास कामाचे उद्घाटन समाज कल्याण सभापती शारदा कांबळे यांच्या हस्ते पार पडले. तसेच गावातील रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभही करण्यात आला. भाजपा नेते, आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून दोन्ही कामे मंजूर झाली आहेत. दलित वस्ती योजनेतून रस्ता काम मंजूर आहे. तर शारदा कांबळे यांच्या स्वनिधीतून स्ट्रीट लाईट काम मार्गी लागले आहे. यावेळी शारदा कांबळे म्हणाल्या, तालुक्याचे शेवटचे टोक अशी मौंदे गावची ओळख आहे.

या गावाला आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून विकास प्रक्रियेत आणण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत. गावचा विकास करणे ही लोकप्रतिनिधींची जबाबदारीच आहे. परंतु विकास करणाऱ्या नेतृत्वाच्या मागे खंबीरपणे उभे रहाणे ही देखील नागरिकांची जबाबदारी असल्याचे सांगितले. यावेळी सरपंच आनंत मौंदेकर, गंगाराम कांबळे, बबन कांबळे, दत्ताराम मोरे, मारुती मोरे, सुरेश मोरे, सुनील रावराणे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार नितेश राणे व समाज कल्याण सभापती शारदा कांबळे यांनी गावात मोठ्या प्रमाणात विकासासाठी निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल मौंदेवासियांनी त्यांचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा