You are currently viewing आपली परंपरा, संस्कृती देवतांची देणगी; ती टिकवणे आपली जबाबदारी

आपली परंपरा, संस्कृती देवतांची देणगी; ती टिकवणे आपली जबाबदारी

भाजपा नेते निलेश राणे; श्री देव कुडाळेश्वर कीर्तन महोत्सवाला भेट

 

कुडाळ :

 

कुडाळ येथे श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळांने आयोजित केलेल्या श्री देव कुडाळेश्वर कीर्तन महोत्सव कार्यक्रमात भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख माजी खासदार निलेश राणे यांनी कुडाळेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी निलेश राणे म्हणाले की, आपली परंपरा, संस्कृती ही देवतांची देणगी आहे. ही परंपरा टिकवणे आपली सर्वांची जबाबदारी आहे.

श्री देव कुडाळेश्वर मंदिरामध्ये श्री देव कुडाळेश्वर कीर्तन महोत्सव सुरू आहे. या महोत्सवानिमित्त भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांनी दर्शन घेऊन कीर्तन महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी चे उद्घाटन केले.

यावेळी भाजपचे जिल्हा चिटणीस विनायक राणे, उत्सव मंडळाचे अध्यक्ष किशोर काणेकर, भाजप गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक अभिषेक गावडे, नगरसेविका चांदणी कांबळी, माजी नगरसेवक राकेश कांदे, सुनील बांदेकर, योगेश राऊळ, राजेश पडते, महेश कुडाळकर, निलेश कुडाळकर, सुरेश राऊळ, श्रीकृष्ण कुंटे, उदय वेलणकर, चंदन कांबळी, विजय कांबळी आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा