You are currently viewing पावशी ग्रामपंचायत कार्यालय येथे पावशी सर्व्हिस रस्त्यासंदर्भात निलेश राणे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न

पावशी ग्रामपंचायत कार्यालय येथे पावशी सर्व्हिस रस्त्यासंदर्भात निलेश राणे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न

*पावशी सर्व्हिस रस्त्याच काम येत्या चार दिवसात सुरू करण्याचा निलेश राणे यांचा शब्द..*

 

कुडाळ :

गेल्या चार वर्षात उबाठा शिवसेनेच्या खासदार, आमदार यांना जमले नाही ते भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांनी करून दाखविले पावशी येथील लिंग मंदिर ते बोरभाटवाडी पर्यंत सर्व्हिस रोडचे काम आता लवकरच होणार आहे. याबाबत पावशी ग्रामपंचायत येथे राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांनी ग्रामस्थांसमवेत बैठक घेऊन या कामाबाबत माहिती दिली.

पावशी येथील लिंग मंदिर ते बोरभाटवाडी पर्यंतच्या अंतरावर ग्रामपंचायत, तलाठी, रास्त धान्य दुकान अशी विविध कार्यालय असून ग्रामपंचायत कार्यालयासमोर एस. टी. बस थांबा आहे आणि या ठिकाणी येण्यासाठी ग्रामस्थांना राष्ट्रीय महामार्गाच्या मुख्य चौपदरीकरण रस्त्याच्या बाजूने चालत तसेच वाहने घेऊन यावं लागतं त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे आणि या कारणामुळे गेल्या चार वर्षापासून पावशी ग्रामस्थ उबाठा शिवसेनेचे खासदार, आमदार यांच्याकडे लिंग मंदिर ते बोरभाटवाडी पर्यंत जाणारा रस्ता सर्विस रोड म्हणून करावा अशी मागणी करत आहेत मात्र या मागणीला उबाठा शिवसेनेच्या खासदार आमदाराने उडवून लावले.

दरम्यान पावशी सरपंच वैशाली पावसकर यांनी भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांची भेट घेऊन ही समस्या सांगितली. ही समस्या सोडविण्यासाठी त्यांनी पाठपुरावा सुरू केला आणि दोन महिन्यांत पावशी ग्रामस्थांना न्याय मिळवून दिला. याबाबत भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांनी ग्रामस्थांसमवेत अधिकाऱ्यांची पावशी ग्रामपंचायत येथे बैठक घेतली या बैठकीत रस्त्याच्या कामाबाबत माहिती दिली. हा सर्विस लवकरच होणार असल्याचे भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांनी सांगितले.

पावशी सरपंच वैशाली पावसकर यांनी बोलताना सांगितले की, गेली चार वर्षे या संदर्भात आम्ही सातत्याने आमदार व माजी खासदार यांच्याशी वेळोवेळी भेट घेऊन चर्चा केली मात्र त्यांनी अद्यापपर्यंत कुठलीही ठोस कार्यवाही केली नाही. आम्ही महामार्ग अडवला सर्वांवर गुन्हे दाखल झाले मात्र प्रश्न तसाच राहिला, शेवटी निलेश राणे यांच्याजवळ जाऊन आमची समस्या मांडल्यावर तत्काळ कार्यवाही करत त्यांनी विषय मार्गी लावला, आता लवकरच काम सुरू होईल याचा आनंद आहे असे सांगितले.

यावेळी ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, देवेंद्र सामंत, रुपेश कानडे, सरपंच वैशाली पावसकर, जिल्हा कार्यकारी सदस्य श्रीपाद तवटे, माजी सभापती राजन जाधव, ग्रामपंचायत सदस्य वृणाल कुंभार, नयना तवटे, ओंकार करंगुटकर, लीना पवार, स्नेहा पंडित, बुथ अध्यक्ष राजा चव्हाण, रमेश कुंभार, बाबू शेलटे, प्रकाश पावसकर, सागर तुळसकर, सर्वेश पावसकर, मारुती पावसकर, स्वरूप वाळके, आनंद शेलटे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा