You are currently viewing वेंगुर्ले तालुक्यातील सागरतीर्थ – टाक येथील काँग्रेस चे विभागीय अध्यक्ष किरण तांडेल यांचा सहकाऱ्यांसह भाजपा मध्ये प्रवेश

वेंगुर्ले तालुक्यातील सागरतीर्थ – टाक येथील काँग्रेस चे विभागीय अध्यक्ष किरण तांडेल यांचा सहकाऱ्यांसह भाजपा मध्ये प्रवेश

*वेंगुर्ले तालुक्यातील सागरतीर्थ – टाक येथील काँग्रेस चे विभागीय अध्यक्ष किरण तांडेल यांचा सहकाऱ्यांसह भाजपा मध्ये प्रवेश*

*भाजपा मच्छिमार सेलच्या तालुका उपाध्यक्ष पदी किरण तांडेल यांना नियुक्ती*

*भाजपा आसोली – न्हैचीआड बुथ अध्यक्ष पदी विश्राम विजय धुरी यांची निवड.*

वेंगुर्लेत भाजपा मध्ये जोरदार इनकमिंग सुरु झाले असुन आठवड्याभरात उभादांडा – कुर्लेवाडीतील पक्षप्रवेशा नंतर सागरतीर्थ ग्रामपंचायत हद्दीतील टांक येथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला आहे .
या पक्षप्रवेशावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई म्हणाले कि भाजपा विरोधात विरोधी पक्ष नरेटीव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत आहे , परंतु मोदी सरकार ने केंद्रात व महायुती सरकार ने राज्यात विकासाचा डोंगर उभा केलाय हे निर्विवाद सत्य आहे . हे विकासात्मक कार्य सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी ही कार्यकर्त्यांची आहे.
सरकारने समाजातील सर्व घटकांना डोळ्यासमोर ठेवून विविध योजना आणल्या , मोदी सरकारने गोरगरीब जनतेसाठी दरमहा मोफत धान्य , तसेच राज्य सरकार ने महीलांना एस् टीत ५०% प्रवासभाडे सुविधा , शेतकऱ्यांना शुन्य विज बिल , मुलींना मोफत उच्च शिक्षण , महीलांसाठी लाडकी बहीण योजना, बचत गटांसाठी रिव्हाॅल्व्हिंग फंड , ग्रामरोजगार सेवकांना ८ हजार रु.अनुदान , महीलांसाठी ३ सिलेंडर मोफत , ६५ वर्षावरील महीला व पुरुषांना श्रावण बाळ योजना व राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत १५०० रु प्रती महा , ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना एस्.टी.मध्ये मोफत प्रवास , यासारख्या हजारो योजना व तेवढ्याच प्रमाणात विकास कामांचा डोंगर उभारुन महाराष्ट्र राज्य प्रगतीपथावर असताना वसुली सरकारला पुन्हा सत्तेत थारा नाही हे आपण सर्वांनी मतदान रुपाने दाखवुन दिले पाहिजे , असे आवाहन केले.
यावेळी व्यासपीठावर मान्यवर म्हणून तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , मच्छिमार नेते दादा केळुसकर , सरपंच संघटनेचे विष्णु उर्फ पपु परब , जेष्ठ कामगार नेते प्रकाश रेगे , आसोली उपसरपंच संकेत धुरी , सागरतीर्थ उपसरपंच सुषमा गोडकर , तालुका उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे , शक्तिकेंद्र प्रमुख महादेव नाईक व जगन्नाथ राणे , बुथ प्रमुख पांडु फोंडनाईक व बाळु वस्त , संदिप देसाई व बाळु फटनाईक उपस्थित होते .
यावेळी आश्वीनी तांडेल , राजाराम तारी , दत्तात्रय वस्त , सखाराम देवजी , रामकृष्ण बागकर , शमिका गोडकर , प्रतिक्षा गोडकर , श्रेया गोडकर , संजना नाईक , रुपेश तांडेल, घाब्रु फर्नांडिस , नामदेव गवंडे , संतोष कावले , चेतन बागकर इत्यादींनी भाजपा मध्ये प्रवेश केला .
यावेळी अनिल बागकर , यशवंत फटनाईक , मोहन कोचरेकर , प्रदिप नाबर इत्यादी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते .

______________________________
*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध🔹मधातला आवळा*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ🔸गावठी सुरय तांदूळ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ🔸कडवे वाल*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन🔸पेणचे पांढरे कांदे माळ*
*🔸 मालवणी मसाला🔸खडा मसाला*
*🔸 भिमसेनी कापुर🔸मकाना🔸काजुगर*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा