सावंतवाडी :
सावंतवाडीतील यशराज मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधांनी सज्ज “आई टेस्ट ट्यूब बेबी” सेंटरचे आज १२ ऑक्टोंबर ला विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर उद्घाटन होणार असून सौ. सुनीला सुधाकर नवांगुळ यांच्या शुभहस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. गोवा राज्यातील स्पेशालिस्ट डॉ. केदार पडते यांची प्रमुख उपस्थिती यावेळी असणार आहे.
महिलांच्या जीवनात मातृत्वासारखा दुसरं सुख नसतं मात्र काही अडचणी समोर असतात. आजकाल विवाहित जोडप्यांमध्ये वंदेत्वाची समस्या अधिक आढळून येते यामागे विविध कारण असून मातृत्व प्राप्त न झाल्याने महिलांना समाजात हिणवलं जाऊन महिलांच्या आई होण्याचे स्वप्न अधुरं राहतं.
आई टेस्ट ट्यूब बेबी च्या माध्यमातून मातृत्वाचा सुख जोडप्यांचे नशिबात देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे यासाठी बाहेरील जिल्ह्यात राज्यात होणारा मोठा खर्च देखील टाळता येणार आहे.
सावंतवाडीत अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असं “आई टेस्ट ट्यूब बेबी सेंटर” आम्ही सुरू करत आहोत. आज १२ ऑक्टोंबर २०२४ रोजी सायंकाळी ४ ते ७ वेळेत यशराज मल्टीस्पेशालिस्ट, हॉस्पिटल जुना बांदा नाका, मुंबई गोवा हायवे, सावंतवाडी येथे “आई टेस्ट ट्यूब बेबीचा” शुभारंभ होणार असून यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. राजेश सुधाकर नवांगुळ, सौ मनीषा राजेश नवांगुळ, डॉ. गायत्री शर्मा (पालयेकर), यश राजेश नवांगुळ, ॲड. नकुल पार्सेकर यांनी केले आहे.