You are currently viewing निसर्ग रंग

निसर्ग रंग

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*निसर्ग रंग*

 

केशरलेली

प्राचीवरती प्रभा

सोनेरी आभा….

 

 

हिरवे रान

वा-यासवे डोलते

पाते हसते….

 

निळी निळाई

नभात पसरली

कोर दिसली…

 

मोरपिसारा

रंग निळा जांभळा

तोच सावळा…

 

आगीन फुलं

वसंतात फुलली

फांदी झुलली….

 

हिरवे रावे

उडतात जोमाने

नभी नव्याने….

 

रात्र काजळी

चमकते चांदणी

गोजिरवाणी……।।

🌟🌿

०००००००००००००००🌿🌟

 

*अरुणा दुद्दलवार*

*अरुणिमा@*✍️

प्रतिक्रिया व्यक्त करा