*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी विनायक जोशी लिखित वास्तववादी काव्यरचना*
*कोण थांबतो भारत रत्ना साठी*
निघून गेले टाटा *स्वर्गात*
*नकली* राजे बघत राहिले
कोण थांबतो *रत्न* घ्यायला
स्वाभिमानी टाटा निघून गेले
सन्मानित झाले देशी विदेशी
कशास जातील कुणा दाराशी
कित्येक सन्मान चालत येती
लोळत होती लक्ष्मी पायाशी
सिंगूर वरती *सोडून पाणी*
धडा शिकवला कम्युनिस्टांना
नॅनो बनवून “सामान्यांसाठी”
पाणी पाजले *विरोधकांना*
*ताठ* ठेवून आपला कणा
सन्मानाने गाठला *स्वर्ग*
उद्योग उभारून दिला आधार
खुशीत राहिला कामगार वर्ग
सढळ हाताने करून *दान*
कुबेरालाही लाजवून सोडलं
कोरोनाचे भयानक काळात
ताज असंच वापरून “दिलं”
*हृदय* होत मोठ त्यांच
मुक्त हस्ते *दान* दिलं
कर्क रोग्यांना मदत करून
कित्येकांना जीवदान दिल
निघून गेला *अजातशत्रू*
करून *टाटा* नाव अमर
आदर्शाचा तो *मापदंड*
नाव करून *अजरामर*
विनायक जोशी ✒️ठाणे
मीलनध्वनी/९३२४३२४१५७
गुरुवार १० आक्टोबर २०२४