You are currently viewing आमदार नितेश राणे यांच्या अथक प्रयत्नांना यश.! विजयदुर्ग तरेळे,देवगड नांदगाव निपाणी रस्त्यांचे आज भूमिपूजन

आमदार नितेश राणे यांच्या अथक प्रयत्नांना यश.! विजयदुर्ग तरेळे,देवगड नांदगाव निपाणी रस्त्यांचे आज भूमिपूजन

आमदार नितेश राणे यांच्या अथक प्रयत्नांना यश.! विजयदुर्ग तरेळे,देवगड नांदगाव निपाणी रस्त्यांचे आज भूमिपूजन

*विजयदुर्ग तरेळे रस्त्यासाठी ४१७ कोटींचा निधी

*देवगड नांदगाव निपाणी रस्त्यासाठी ३३१ कोटी

*बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे मिळाले सहकार्य

* देवगड तालुक्याच्या पर्यटन विकासाला चालना देणारी निर्माण होणार नवी वाहिनी

देवगड
तरेळे विजयदुर्ग आणि नांदगाव देवगड अशा मुंबई गोवा महामार्गापासून देवगड तालुक्याला जोडणाऱ्या दोन मुख्य रस्त्यांचे आज भूमी पूजन केले जाणार आहे. आमदार नितेश राणे यांच्या अथक प्रयत्नातून या दोन्ही रस्त्यांसाठी भरघोस निधी प्राप्त झालेला आहे. विजयदुर्ग, पडेल, वाघोटण तरेळे या रस्त्यासाठी 417 कोटी रुपयाचा निधी प्राप्त झाला आहे. तर नांदगाव देवगड या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यासाठी 331 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.या दोन्ही कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांच्या ऑनलाइन उपस्थितीत तर आमदार नितेश राणे प्रत्यक्ष उपस्थितीत होणार आहे. या दोन्हीं सुसज्ज रस्त्यांमुळे देवगड तालुका पर्यटन दृष्ट्या अधिकच विकसित होणार आहे.
देवगड पासून निपाणी पर्यंतचा रस्त्याची अनेक वर्षांपासून मागणी होती, त्यालाही एल.ओ.ए. मिळाले आहे. हा रस्ता देवगड तालुक्यातील सर्व गावांना जोडतो आणि यासाठी अंदाजे ३३१ कोटी रुपयांचा एल.ओ. ए मंजूर झाला आहे. अशा प्रकारच्या विकास कार्यांमुळे या विभागतील जनजीवनात सुधारणा होईल आणि आर्थिक प्रगतीला चालना मिळेल.तसेच विजयदुर्ग  तरेळे रस्त्यासाठी ही ४१७कोटी रुपयांचा निधी मिळालेला आहे, ज्यामुळे देवगडच्या विकासात महत्त्वपूर्ण प्रगती होईल.
दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्व गोड यांनी सादर केलेला प्रस्तावानुसार या कामांना मंजुरी मिळाली आहे आमदार नितेश राणे यांनी या प्रस्तावांची सातत्यपूर्ण पाठपुरावा करून या कामांना निधी प्राप्त करून घेतला आहे त्यामुळे तरेळे नांदगाव सह देवगड तालुक्याचा विकास अधिक गतिमान होणार देवगड तालुका महामार्गाशी थेट जोडला जाणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा