*आमदार वैभव नाईक यांनी मसुरे मर्डे येथील श्री देवी पावणाई मंदिरासाठी दिला प्रशस्त सभामंडप*
*आमदार फंडातून दिला १० लाख रु. निधी; बुधवारी झाले लोकार्पण*
श्री देवी पावणाई मंदीर हे मसुरे मर्डे गावातील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून या मंदिराला विशेष असे महत्व आहे.या ठिकाणी अनेक भाविक भक्तगण दर्शनासाठी येत असतात. मंदिर परिसरात सभामंडप उभारावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ व शिवसैनिकांनी आमदार वैभव नाईक यांच्याकडे केली होती.आ.वैभव नाईक यांनी तात्काळ याची दखल घेऊन आपल्या आमदार स्थानिक विकास निधीतून १० लाखाचा निधी सभामंडपासाठी मंजूर करून दिला होता.याठिकाणी प्रत्यक्षात प्रशस्त असे सभामंडप उभारण्यात आले असून काल बुधवारी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते या सभामंडपाचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी बोलताना आ. वैभव नाईक म्हणाले की, आपला आमदार या नात्याने मसुरे मर्डे गावाचा सर्वतोपरी विकास करण्याची जबाबदारी माझी असून. ती जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न मी करीत आहे. यापुढे देखील अशीच विकास कामे मार्गी लावली जातील असे आ. वैभव नाईक यांनी सांगितले. यावेळी ग्रामस्थांनी आमदार वैभव नाईक यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करत आभार मानले आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पाठीशी राहण्याचा निर्धार केला.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कुडाळ विधानसभा संपर्कप्रमुख संग्राम प्रभूगावकर, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, जिल्हा प्रवक्ते मंदार केणी,युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरोसकर,विभागप्रमुख राजेश गावकर, महिला तालुका समन्वयक पूनम चव्हाण,अमित भोगले,राहुल सावंत,बाबुराव प्रभूगावकर,महेश बागवे,आशिष परब,संदीप हडकर सुरेखा वायंगणकर,नरेंद्र सावंत,सुहास पेडणेकर,पप्पू मुळीक,किसन लोखंडे, पप्पू परब,कृष्णा पाटील, मामी पेडणेकर माया मुणगेकर,रमाकांत सावंत,अनिकेत खोत,नंदकुमार मुळीक,आदी पदाधिकारी व शिवसैनिक आणि देवस्थान समितीचे पदाधिकारी व मानकरी ग्रामस्थ शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते.