देवगड :
जिल्ह्यात मधुमेहाचे प्रमाण वाढते आहे. त्यामुळे लोकांमध्ये जागृती करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ मैंगो सिटी देवगड, देवगड तालुका मुख्याध्यापक संघ आणि डी. एफ. सी. देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने डायबेटिस आपल्या मुठीत या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. १३ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ ते ५० यावेळी सदर व्याख्यान देवगड येथील इंद्रप्रस्थ हॉल येथे होणार आहे. लोकांना मधुमेह म्हणजे काय? तो कशामुळे होतो? तो कसा टाळावा? याबाबत डॉ. प्रशांत मडव, डॉ. गार्गी ओरसकर तसेच फिटनेस ट्रेनर डॉ. प्रफुल्ल आंबेरकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. यासाठी प्रवेश मोफत असून देवगड तालुकावासीयांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन दीर्घायू हेल्थ क्लिनिकचे डॉ. अरुण गुमास्ते आणि डॉ. नम्रता बोरकर यांनी केले आहे. यावेळी दु. १ वा. धाडसी बहीण या स्वसंरक्षण शिबिराचे आयोजन नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यासाठी ठेवण्यात आले आहे. या शिबिरासाठी सिंधुरत्न स्पोर्ट्स अकॅडमीचे ओमकार सावंत, बालदत्त सावंत, अविराज खांडेकर मार्गदर्शन करणार आहेत.
रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड व तालुका मुख्याध्यापक संघ यांच्यावतीने देवगड तालुका पत्रकार व देवगड तालुका आजी-माजी मुख्याध्यापक यांच्यासाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले आहे. डॉ. बी. जी. शेळके, निगाचे डॉ. प्रशांत मडव, डॉ. अरुण गुमास्ते, डॉ. सतीश लिंगायत हे रुग्ण तपासणी करणार आहेत. येथील डॉ. मयुर व डॉ. मीनल नागवेकर यांनी यासाठी सहाय्य केले आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. अनंत नागवेकर, डॉ. कीर्ती नागवेकर यांनी केले आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रोटरी क्लब मँगो सिटी, देवगड मुख्याध्यापक संघ, डी.एफ.सी. देवगड, रोटरीचे गौरव पारकर, देवगड तालुका मुख्याध्यापक संघाचे प्रा. यादव, नंदन घोगळे, डॉ स्वप्नील शिंगाडे, डॉ. पल्लवी पाटणकर मेहनत घेत आहेत.