*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*साजनी*
ही रात्र पौर्णिमेची
चल कौमुदीत न्हाऊ
गंध धुंद रानात
चल प्रेमगीत गाऊ
पाण्यात सरोवराच्या
घरकुल ते ओढके
प्रीत बंध बांधते
जरी असेल ते मोडके
सुगंधली रातराणी
परिमळ तो चहुकडे
चांदणी सम मुखडा
मान वळव मजकडे
पहुडल्या रानंवेली
झोपली रांन पाखरे
का उगाचं हा रुसवा ?
रुसलीस रानी का बरे ?
गगनात शुक्रतारा
हळू डोकावून पाहतो
धुंद चांदण्यात साक्ष
आपल्या प्रीतीची देतो
लहरीत पाण्याच्या या
चांदणे चमचमते
उतरली भूमीवरी
रंभा, उर्वशी भासते
*शीला पाटील. नाशिक.*