You are currently viewing माझी माय

माझी माय

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या कवयित्री भारती वाघमारे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*माझी माय*

 

अंगावरची कपडे खूप ठिकाणी फाटली होती .

शेतात काम करता करता माझी माय थकली होती .

 

पैसा जुळून जुळून नवी कपडे घेतली होती .

पण माझी माय फाटकं लुगडं नेसली होती .

 

जीवाची तगमग होत होती .

गरिबी आवासून उभी होती.

 

पण माझी माय कधीच खचून गेली नव्हती .

जीवाचं करून रान काम करत उभी होती.

 

हसत मुखी माझी माय तक्रार कधी करत नव्हती .

या बसा पाणी प्या आपुलकी म्हणत होती .

 

साधी भोळी माझी माय कधी कुणा कळली नाही .

डोंगराएवढं दुःख तिचं रडत कधी बसली नाही.

 

सुंदर तिची छबी परी सारखी दिसायची .

हसताना गालावर खळी नाजुक दिसायची.

 

लुगडं होतं फाटक पण नेटके ती नेसायची .

हिरव्या साडी मध्ये माझी माई देवी वाणी दिसायची.

 

आज मला माईची आठवण खूप येते .

स्वप्नामध्ये जणू ती मला मिठीत घेते.

 

सौ भारती वाघमारे

प्रतिक्रिया व्यक्त करा