You are currently viewing आशिर्वाद आई देवी मातेचा

आशिर्वाद आई देवी मातेचा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*आशिर्वाद आई देवी मातेचा*

 

दे आई मजला आशिर्वाद
मी भक्त घालीतो तुजला साद
हे आई…. हे आई….
हे आई…. हे आई….

तुझ्या कृपेची असो सावली
तू तर साऱ्या विश्वाची माऊली

तुझ्या कृपेची असू दे छाया
भक्ती माझी जाई ना वाया

तुझी पूजा आराधना करीन
तुझ्या भक्तीत होईन मी लीन

आई माझ्या नवसाला पाव गं
संकटात भक्ताघरी धाव गं

उद्धार कर तू माझ्या कुळाचा
भरीन ओटी वान खण नारळाचा

नमन करतो दे वरदान आम्हाला
प्रसादाला श्रीफळ पेढे नैवेद्याला

तू अंबा तू जगदंबा तू भवानी तू चंडिका
तू दुर्गा अन् तू कालिका तू एकविरा तू रेणूका

तू सप्तश्रृंगी तूच कात्यायनी
महिषासूरमर्दिनी तूच दैत्यासूर नाशिनी

तू महालक्ष्मी तूच महाकाली
तू महासरस्वती तूच कुलस्वामिनी

अनेक रुपे घेऊन आली
भक्तांना तू तारूण गेली

आलो शरण मी तुजला माते
दे कृपाशीर्वाद तुझ्या वरदहस्ते

दे आई मजला आशिर्वाद
मी भक्त घालितो तुजला साद
हे आई…. हे आई….
हे आई…. हे आई….

कवी :-
*चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*चांदवडकर, धुळे.*
७५८८३१८५४३.
८२०८६६७४७७.

प्रतिक्रिया व्यक्त करा