You are currently viewing देवी कालरात्री

देवी कालरात्री

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका विद्या रानडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*देवी कालरात्री—*

————————

 

दिवस सातवा नवरात्रीचा ।

दुर्गादेवीच्या नव्यारूपाचा

दुर्गा झाली आज कालरात्री ।

दैत्यनाशिनी असुरमर्दिनी॥१॥

विलोभवाणे नाही रूप।

कृष्ण वा काळा तिचा रंग

वाहनही कोणते तिचे।

गर्दभास वाहन केले॥२॥

तिला पाहता राक्षसांचा थरकाप।

अशी रंगरूप धारिणी

चतुर्भुज ,शस्रधारिणी ।

चामुंडा चंडमुंड नाशिनी॥३॥

भक्तांसाठी मन कोमल।

एक हात अभय मुद्रेत।

बाकी हाती शस्र धारण।

होणार आज रणकंदन॥४॥

चामुंडा ती,तीच दुर्गा। कालरात्री तीच अंबा भवानी

करू उपासना मनापासुनी।

ती माता जगज्जननी॥५॥

 

॥विद्या रानडे॥२१|१०|२३

प्रतिक्रिया व्यक्त करा