अवकाळी पावसामुळे भात शेतीची नुकसान भरपाई मिळण्याबाबत उ.बा.ठा शिवसेनेकडून तहसीलदार यांना निवेदन
युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, प्रथमेश सावंत यांनी दिले निवेदन
कणकवली
अवकाळी पावसामुळे भात शेतीचे झालेले नुकसान याबाबत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, प्रथमेश सावंत यांनी यावेळी तहसीलदार यांना निवेदन दिले गेल्या आठ दिवसात सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. रविवार दि. 6 ऑक्टोबर 2024 रोजी कणकवली सहा अन्य तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. भात शेतीचे उत्पादन शेवटच्या टप्प्यात असताना अवकाळी पावसामुळे भात शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी कापणीसाठी टायर झालेले भात पीक वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाले आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. अश्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा मिळावा व शेतकऱ्याच्या भात शेतीच्या नुकसानीचे पंचनामे होऊन त्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या भात शेतीची नोंदनी सातबारावर नसेल तर ती तात्काळ तलाठ्यांकडून करून घेण्यात यावी. ई-पीक पाहणी मध्ये देखील तलाठ्यांना तात्काळ नोंदी घेण्याचे आदेश द्यावेत. नुकसान ग्रस्त सर्व शेतकऱ्यांना भात शेतीची नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, प्रथमेश सावंत, युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, धीरज मेस्त्री, संदीप गांवकर, लक्ष्मीकांत लाड, माधवी दळवी, संजना कोलते उपस्थित होते.